औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वार्षिक परीक्षेत भारतातून प्रथम आलेल्या देसाईगंज येथील कु. सुशील हेडाऊ या विद्यार्थ्यांचा आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार..
देसाईगंज:(gadchiroli) :-औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी घेतलेल्या वार्षिक परीक्षेत देसाईगंज येथील सुशील अनिल हेडाऊ यांनी डिझेल मेकॅनिक या अभ्यासक्रमात संपुर्ण देशातून अव्वल स्थान पटकाविले आहे. देशभरातील सर्वच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून सुशील हेडाऊ यांनी 600 पैकी 594 गुण मिळवून देशात प्रथम स्थान पटकाविलेला आहे. त्याच्या या यशाबद्दल आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. गडचिरोली या अती दुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त महाराष्ट्राच्या शेवटच्या जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यासाठी सुशीलचा हा यश गौरवास्पद व अभिनंदनिय असून या विद्यार्थ्यांचा दिनांक 17 सप्टेंबर ला दिल्ली येथे होणाऱ्या दीक्षांत समारोहात देशाचे पंतप्रधान मा.नाम. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.
यावेळी संस्थेचे प्राचार्य विकास आडे, बादल घरडे गट निर्देशक, सर्पमित्र अमोल पत्रे आदी उपस्थित होते.