उपविभाग भामरागड अंतर्गत कवंडे येथे ठीक छत्तीसगड सीमेवरच नवीन पोलीस स्टेशनची स्थापना
गडचिरोली ता 09 मार्च:-1000 सी–60 कमांडो, 25 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन विशेष पोलीस महानिरिक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक सीआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, 37 बटा. चे कमांडण्ट श्री. दाओ इंजीरकान कींडो व ग्रामस्थंाच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन
मागील 02 वर्षात एकुण 07 नवीन पोस्टे/पोमकें करण्यात आले स्थापन नवीन पोलीस स्टेशन करिता 02 दिवसांमध्ये पोस्टे नेलगुंडा ते पोस्टे कवंडे पर्यंत 06 कि.मी.चा कच्चा रस्ता तयार करण्यात आला नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावेल… पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल माओवाददृष्ट अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यंाचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक 09/03/2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत कवंडे या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. सन 2024 या वर्षाअखेर दिनांक 11/12/2024 रोजी याच भागात अतिदुर्गम पेनगंुडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची व यावर्षी दिनांक 30/01/2025 रोजी नेलगंुडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली होती. तसेच मागील 02 वर्षात एकुण 07 नवीन पोस्टे/पोमकें स्थापन करण्यात आले. भामरागड पासून 25 किमी., पोस्टे नेलगंुडा पासुन 06 कि.मी. व छत्तीसगड सिमेला लागूनच असलेल्या अति-दुर्गम कवंडे व आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस स्टेशन कवंडे मैलाचा दगड ठरेल.सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1000 पेक्षा जास्त मनुष्यबळ, 10 जेसीबी, 09 ट्रेलर, 04 पोकलेन, 25 ट्रक व 10 डंपर इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली. तसेच पोलीस स्टेशनची उभारणी करतांना 02 दिवसांमध्ये पोस्टे नेलगुंडा ते पोस्टे कवंडे पर्यंत 06 कि.मी.चा कच्चा रस्ता तयार करण्यात आला. सदर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 16 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 04 अधिकारी व 41 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 11, नवी मुंबईचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 37 बटा. सी कंपणीचे 01 असिस्टंट कमांडन्ट व 69 अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 08 पथक (200 कमांडोज)व क्युएटी सिआरपीएफचे 02 पथक (50 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच गडचिरोली पोलीसांनी पोस्टे कवंडे परिसरात असलेले माओवाद्यांचे स्मारक नष्ट केले. तसेच पोस्टे उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन कवंडे हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नववारी साडी, पुरुषंाना घमेले, ताडपत्री, स्प्रे-पंप, युवकांसाठी कपडे, ब्लॅन्केट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट साहित्य, व्हॉलीबॉल साहित्य इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.
सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस उपमहानिरिक्षक, केंद्रीय राखीव पोलीस बल, गडचिरोली श्री. अजय कुमार शर्मा, गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, कमांडण्ट 37 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल श्री. दाओ इंजीरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. व्हि. सत्यसाई कार्तिक, उप-कमांडण्ट (2आयसी) 37 बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल श्री. सुजित कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड श्री. अमर मोहिते व पोलीस स्टेशन कवंडेचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोउपनि. मंदार शिंदे, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.