व्हॉईस ऑफ मीडिया राज्य महिला उपाध्यक्षपदी तिलोत्तमा समर हाजरा यांची निवड
गडचिरोली : व्हॉईस ऑफ मीडिया राज्य महिला कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी तिलोत्तमा समर हाजरा यांची निवड करण्यात आली आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया राज्य महिला कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष पदावर रश्मी मारवाडी शहर (नाशिक), प्रदेशाध्यक्ष सविता चंद्रे ग्रामीण. (यवतमाळ), कार्यध्यक्ष प्रतिभा शेलार (सातारा), कार्यध्यक्ष स्वाती धोंडगे (पुणे), उपाध्यक्ष पदावर गडचिरोली येथील तिलोत्तमा हाजरा यांची निवड करण्यात आली आहे. तिलोत्तमा हाजरा या ग्लोबल गडचिरोली न्यूज पोर्टलच्या संचालिका व मुख्य संपादक आहेत. त्यांनी गोंडवाना विद्यापीठातून पत्रकारितेची पदविका उत्तम गुणांनी प्राप्त केली असून मागील काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात महिला पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय विविध सामाजिक संघटनांच्या अनेक पदांवर असून सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे सर , गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार , राज्याचे पदाधिकारी ,संजय टिपाले ,विदर्भ पदाधिकारी सुमित पाकलवार, विलास ढोरे ,मुकुंद जोशी ,नशिर हाशमी,जयंत निमगडे,उदय धकाते , आणि व्हॉईस ऑफ मीडिया चे सर्व वरीष्ठांचे आभार मानले असून आपल्या पदाची जबाबदारी पूर्ण निष्ठेने सांभाळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या या पदावर निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.