कर्तव्यवर जात असताना पोलीस शिपायाचा मृतु

62

गडचिरोली :  विशेष कृती दल / SAG गडचिरोली येथे कार्यरत असणारे पोशी / 3811 रवीश मधुमटके वय 34 वर्षे यांचा काल संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कियार ते आलापल्ली रस्त्यावरील रोड ओपनिंग अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी ते आपल्या पथकासोबत रवाना झाले होते. यादरम्यान पोलीस स्टेशन कोठीपासून 5 किलोमीटर चालल्यानंतर, त्यांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली असता त्यांना तात्काळ भामरागड येथील ग्रामीण आरोग्य केंद्र/आरएचसी येथे हलवण्यात आले होते, मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले होते.

 

त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. आज रोजी त्यांचा अंत्यविधी गडचिरोली येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here