2014 ते 2024 पर्यत भाजपाचा गढ़ राखलेला गडचिरोली विधानसभा क्षेत्र कॉग्रेस मोडीत काढेल काय?
मनोहर पाटील पोरेटी कॉग्रेस तर भाजपाचे नवखे ऊमदेवार डॉ मिलींद नरोटे यांच्यात थेट लढत
गडचिरोली :- s bharat news network दि.08 भाजप आणि काँग्रेस मधील तिकिट नाकारलेल्या नाराज इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आता भाजप उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे dr.milind narote व काँग्रेस उमेदवार manohar poreti मनोहर पोरेटी यांच्यात थेट लढत होणार आहे. 2014 व 2019 या सलग दोन टर्म मध्ये भाजपचे उमेदवार डॉ देवराव होळी यांच्या विरोधात काँग्रेसने अनुक्रमे सगुणा तलांडी व डॉ चंदा कोडवते यांना उमेदवारी दिली डॉ कोडवते यांनी बऱ्या पैकी मते घेतली असली तरी समोर महीला उमेदवार असल्याने व मोदी लाटेने भाजपला दोन टर्म फारसे परिश्रम करावे लागले नाही. मात्र 2024 ची निवडणुक रंगतदार आणि चुरशीची होणार असल्याचे संकेत आहे. लोकसभा निवडणूकीत भाजप उमेदवार Ashok nete अशोक नेते यांना गडचिरोली विधानसभा क्षेत्रात 22 हजारांच्या आसपास पिछाडी होती. ही पिछाडी भरून काढण्याचे भाजपपुढे आव्हान आहे.. यासाठी गडचिरोलीत भाजपने नव्या चेहऱ्यावर डाव टाकला आहे. डॉ. मिलिंद नरोटे यांनी वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत असताना धानोरा, गडचिरोली आणि चामोर्शी या तिन्ही तालुक्यांतील जनतेशी संपर्क प्रस्थापित केला आहे. तसेच सामाजिक उपक्रमातून एक वेगळी ओळखही निर्माण केली आहे. नेमका याचा फायदा भाजपला किती होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चामोर्शी आणि गडचिरोली तालुक्यात लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा विचार केला भाजप आणि काँग्रेस मध्ये फारसे अंतर नाही मात्र धानोरा तालुक्यात अकरा हजारांची भाजपला पिछाडी असल्याने या तालुक्यातील पिछाडी भरून काढण्याचे खुप मोठे आव्हानं त्यांच्यासमोर असणार आहे. तालुक्यातील आदिवासीं समाजाची एक गठ्ठा मते काँग्रेस कडे वळती झाली आता काँग्रेस उमेदवाराचा धानोरा गृह तालुका असल्याने भाजप तिथे किती Damage control करते यावर बरेचसे गणित अवलंबून असणार आहे…. उमेदवारी डावलली गेल्याने होळी समर्थक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे त्यामुळें ते भाजप उमेदवारा चे काम किती एकदिलाने करतील याबद्दल साशंकता आहे… लोकसभा निवडणूकीत चामोर्शी तालुक्यातील जमीन भूसंपादन प्रकरणी कोनसरी परीसरातील बारा गावच्या मतदारांनी भाजपवर आपला रोष दाखविला आता विधानसभा निवडणूकीत तेच चित्र राहिल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात…. तर उच्चविद्याविभूषित चेहरा, स्वतचे नेटवर्क, आदिवासीं युवकांमध्ये असलेली लोकप्रियता, भाजपचा परंपरागत मतदार, जनसंपर्कात सातत्य, या जमेच्या बाजूच्या जोरावर ते गड सर करणारं का हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे तर काँग्रेसने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मर्जीतील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांना उमेदवारी देत सलग दोन टर्म भाजपकडे असलेला हा मतदासंघ काँग्रेसकडे खेचून आणण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरले आहे. विजय वडेट्टीवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. लोकसभेत आंबेडकरी मतांचे विभाजन न झाल्याने ही मते काँगेसच्या पारड्यात पडली त्यामुळे काँग्रेसला. फायदा झाला आताही तिचं स्थिती असल्याने एकगठ्ठा आंबेडकरी मते काँग्रेसच्या पारड्यात जाण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेत आदिवासीबहुल भागात काँग्रेसला बऱ्यापैकी मते मिळाली, ग्रामसभा काँगेसच्या बाजूने होत्या, चामोर्शी तालुक्यांतील लोहउद्योग प्रकल्प जमीन भूसंपादन बाधित गावामध्ये काँग्रेस वरचढ ठरली, मात्र हेच चित्र विधानसभेतही दिसणार का हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसने मतदारांना गृहीत धरण्यास सुरवात केली. मात्र लोकसभेत भाजपच्या उमेदवारावर असलेल्या नाराजीमुळे व अंतर्गत गटबाजी मुळे भाजपला फटका बसला मात्र विधानसभेचे गणित वेगळे असल्याने व भाजपने नवा चेहरा दिल्याने अँटी इन्कमबसी चा फटका भाजपला बसण्याची शक्यता कमी आहे. माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे पुत्र प्रदेश काँग्रेसचे सचिव विश्वजीत कोवासे यांनी मतदार संघ पिंजून काढला मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याने काँग्रेस मधील एक गट नाराज आहे. तसेच मनोहर पोरेटी यांना तिकिट जाहिर होताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या खास मर्जीतील पदाधिकारी, व ठेकेदारीचा व्यवसाय असणाऱ्या काही विशिष्ट व्यक्तींनी प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतल्याने काँग्रेस मधील एका गटात असंतोष असून प्रचार कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी ही विशिष्ट मंडळीच्या हातात असल्याने काँग्रेसच्या या गटात नाराजीची भावना आहे.त्यामुळें लोकसभेत एकदीलाने लढलेली काँग्रेस मात्र विधानसभेत एकदिलाने काम करण्याची शक्यता कमी आहे.. एकंदरित भाजप आणि काँग्रेस मध्ये थेट लढत असलेल्या या मतदार संघात लढत ही चुरशीची होणार असून. यात कोण आपले पारडे जऴ ठेवेल निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे