पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तसे करून दाखवतात आमदार डॉक्टर देवराव होळी

14

पंतप्रधान मोदी बोलतात तसे करून दाखवतात आमदार डॉक्टर देवराव होळी

कोट्यावधी लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण मोदीजींनी पूर्ण केले

माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते आभासी पद्धतीने घरकुलधारकांना चावी वितरण

दिनांक १७ सप्टेंबर गडचिरोली

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून  दाखवल्याप्रमाणे लोकांना मोठ्या प्रमाणावर घरांची बांधकामे पूर्ण करून दिली. सर्वसामान्य गरीब जनतेचे घराचे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवले. आतापर्यंत जे आश्वासन जनतेला दिले ते त्यांनी पूर्ण केली आहेत ते जसे बोलतात तसे करून दाखवतात असे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित घरकुल धारकांच्या चावी वितरणाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोली जिल्हा कार्यशाळा गडचिरोली या अंतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण” टप्पा-१ द्वारे लाभार्थ्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वतीने आभासी पद्धतीने चावी वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला खा. नामदेवराव किरसाण, जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार तथा अधिकारी व कर्मचारी लाभार्थी प्रामुख्यानं उपस्थित होते.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्यात. घरकुल पूर्ण झालेल्या ज्या लोकांना घराची चावी मिळाली त्या घरकुलधारकांचे त्यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here