Superfast, express train stops followed by MP Ashok Nete

246

गडचिरोली :- खासदार अशोकजी नेते यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नाला अखेर यश सुपर फास्ट,एक्सप्रेस ट्रेनचा देसाईगंज ( वडसा) येथे स्टॉपेजस (थांबा) उद्घाटन सोहळा हिरवी झेंडी दाखवुन करण्यात येत आहे.सुपर फास्ट,एक्सप्रेस ट्रेनचा स्टॉपेजेस (थांबा )उद्या दिं ०४ जानेवारी २०२३ ला सकाळी १०.०० वा. देसाईगंज (वडसा ),व दिं ०८ जानेवारी २०२३ नागभिड येथे खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करण्यात येत आहे.मा.खा.अशोकजी नेते यांनी मा. अश्विनी जी वैष्णव केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार यांना सुपरफास्ट, एक्सप्रेस ट्रेनच्या स्टॉपेजस (थांबा) बद्दल केलेल्या सततच्या मागणीला व पाठपुराव्याच्या प्रयत्नाला अखेर यशमागणीप्रमाणे वडसा व नागभिड येथे सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेस (थांबा) होणार यासाठी हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे याकरिता भाजपाचे पदाधिकारी, वरिष्ठ जेष्ठ,कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान खासदार अशोकजी नेते यांनी केले आहे.गडचिरोली:खासदार अशोकजी नेते यांनी रेल्वे संबंधित दिं.११-०८-२०२२ च्या दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने वडसा व नागभिड येथे सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचे स्टॉपेजस (थांबा) वडसा जंक्शन स्टेशनवर वर गाडी संख्या 17007/08 सिकंदराबाद दरभंगा एक्सप्रेस व नागभीड जंक्शन स्टेशनवर गाडी संख्या 12851/52 बिलासपूर चेन्नई एक्सप्रेस या सुपर फास्ट ट्रेनचे स्टॉपेजेस( थांबा ) केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विन जी वैष्णव यांनी मंजुर केलेला आहे. मागील दोन वर्षे कोरोणाच्या काळात सुपरफास्ट ट्रेनच्या स्टॉपेजेस च्या मागणीनुसार जनतेच्या रेल्वे संबंधि समस्या प्रवासाच्या सोयी सुविधेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदनाद्वारे‌ व पाठपुराव्याने सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेज (थांबा) मार्गी लावण्यात यश आले आहे. यासाठी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करण्यात येत आहे. करिता जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते,आमदार कृष्णाजी गजबे, उपाध्यक्ष मोतीभाई कुकरेजा, ता.अध्यक्ष राजु जेठानी तसेच भाजपाचे पदाधिकारी, वरिष्ठ नेते, कार्यकर्ते,बंधू आणि भगनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान खासदार अशोकजी नेते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here