नगरपरिषद गडचिरोलीने दिलेल्या कर नोटिसाचा पुनर्विचार करा अन्यथा मोठे आंदोलन भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांचा नगरपरिषद प्रशासनाला इशारा

94

नगरपरिषद गडचिरोलीने दिलेल्या कर नोटिसाचा पुनर्विचार करा अन्यथा मोठे आंदोलन भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांचा नगरपरिषद प्रशासनाला इशारा muncipal council Gadchiroli

अवाजवी जुलमी कर पद्धतीत तात्काळ दुरुस्ती करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची केली मागणी

अन्यथा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात भाजपा रस्त्यावर उतरेल

इंग्रजांच्या जुलमी कराची आठवण करून देणारे हे कर नोटीस असल्याची शहराध्यक्षांची संतप्त प्रतिक्रिया

गडचिरोली  :- Gadchiroli दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी नगरपरिषद गडचिरोलीने शहरातील नागरिकांना नवीन घर कर आकारणीचे नोटीस बजावले आहे या नोटीस मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विविध प्रकारचे कर लावून लोकांना अवाजवी कर भरण्यास सांगितले आहे. हे गडचिरोली शहर वासीयांवर प्रचंड अन्याय करणारे असून ह्या कर आकारणी नोटीसाचा पुनर्विचार करून दुरुस्ती न केल्यास भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांनी नगरपरिषद गडचिरोलीच्या प्रशासनाला दिले आहे.यावेळी निवेदन देताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष सौ योगिताताई पिपरे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, शहर महामंत्री केशवजी निंबोड, विनोद देवोजवार, आबाजी चीचघरे ,माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, भाजपा महीला मोर्चाच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे, देवाजी लाटकर, युवा मोर्चाचे शहर महामंत्री हर्षल गेडाम, विलास नैताम, दलित आघाडीचे अध्यक्ष अरुण ऊराडे ,आदिवासी महिला आघाडी अध्यक्ष भावनाताई हजारे ,शहर महिला आघाडी महामंत्री रश्मीताई बगमारे, यांचे सह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सुधारित कर मूल्य निर्धारणाचे विवरण करताना नगरपरिषदेने महाराष्ट्र शासनाचा शिक्षण कर, रोजगार हमी उपकर, वृक्ष कर ,अग्निशमन कर ,विविध शिक्षण कर, दिवाबत्ती कर, उपयोगिता शुल्क कर, असे विविध प्रकारचे जाचक व जुलमी कर शहरवासीयांवर लादलेले आहे. हे जुलमी व अन्यायकारी कर नगर परिषदेने तात्काळ रद्द करून सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा दरामध्ये कररचना आकारावी हे कर भरणे इंग्रजांच्या गुलामगिरीची आठवण करून देणारे असून सध्या स्थितीमध्ये नगरपालिकेत कोणत्याही प्रकारचे शासन नसताना प्रशासक अशा प्रकारचे निर्णय घेणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. सदर रचनेमध्ये तात्काळ दुरुस्ती करून करमुल्य सुधारणा करावी अन्यथा या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी मोठे आंदोलन करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी नगर परिषद प्रशासनाला दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here