
भाजपा महिला आघाडी गडचिरोलीची शहर कार्यकारणी बैठक संपन्न

भाजपा जिल्हा महामंत्री सौ.योगीताताई पिपरे व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.गीताताई हिंगे यांचा सत्कार
गडचिरोली:-दि.९ नोव्हेंबर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली शहर कार्यकारणीची बैठक भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. गीताताई हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली गीताताई हिंगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नुकतीच पार पडली.
यावेळी केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षात राबविलेल्या अनेक लोक कल्याणकारी योजनांचा लाभ लाखो लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे आणि विविध सामाजिक घटकांशी जोडून घेण्याचे उद्दिष्ट भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ने निश्चित केले आहे.या दृष्टीने प्रत्येक शहरातील महिला आघाडी पदाधिकारी यांनी शहरातील प्रभागामध्ये कमल शक्ती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भाजप महिला आघाडी पदाधिकारी बैठकीमध्ये आगामी निवडणुकीत महिला कशा पद्धतीने काम करतील हे निश्चित करण्यात आले आहे.
याप्रसंगी भाजपा जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके यांच्या वतीने भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.गीताताई हिंगे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके,लक्ष्मीताई कलयंत्री,शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे,शहर महामंत्री वैष्णवीताई नैतान,माजी नगरसेविका लताताई लाटकर,माजी नगरसेविका अल्काताई पोहनकर,अर्चनाताई बोरकुटे,नीताताई बैस,पुष्पाताई कडकाडे,अर्चनाताई निंबोड,ज्योती बागळे,वंदना शिंपी भाजपा महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.