गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

115

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

गडचिरोली दि.07  पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत काम करणा­या युवक-युवती तसेच पोलीस अंमलदारांसाठी ‘V.L.E.’ (Village Level Entrepreneur) ची एक दिवसीय कार्यशाळा आज दि. 07/11/2023 रोजी एकलव्य सभागृह येथे पार पडली.

 

सदर कार्यशाळेकरीता प्रशिक्षणासाठी 120 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेत त्यांना V.L.E कडुन राबविल्या जाणा­या विविध शासकिय योजनांची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत बँक सेवा, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, सेव्हींग अकाऊंट, डीजीपे, ई-श्रम कार्ड, पेंशन सर्विस, इन्शुरंस या सारख्या सुविधा त्यांच्या दारातच उपलब्ध करून देण्यासाठी सोईचे होणार आहे. यावेळी माहे- मार्च 2023 ते ऑक्टोंबर 2023 मधील V.L.E. चे उत्कृष्ट काम करणा­या युवक- युवतींचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमात उपस्थित मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. यांनी V.L.E. ना मार्गदर्शन केले की, त्यांनी आपल्या हद्दीतील नागरीकांना विविध शासकिय योजनांची माहीती देऊन जास्तीत जास्त नागरीकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा व ही एक चांगली संधी असुन त्याचा पुरेपुर उपयोग करुन आपले भविष्य उज्वल करावे असे सांगीतले. यासोबतच विविध शासकिय योजनांच्या लाभांबाबत फक्त माहिती न देता त्या योजनांचा प्रत्यक्षात लाभ मिळवून देण्यासाठी अधिक प्रयत्न करावा. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित असलेले नागपूर सर्कलचे डिव्हिजन मॅनेजर (V L.E.) श्री. निलेश कुंभारे, श्री. शाहिद शेख व ॲक्सिस बँक, गडचिरोलीचे मॅनेजर श्री. अभिजीत डबीर यांनी उपस्थित सर्व V.L.E. ना मार्गदर्शन केले. गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत प्रोजेक्ट प्रगती, प्रोजेक्ट विकास, प्रोजेक्ट उडाण, प्रोजेक्ट उत्थान, प्रोजेक्ट कृषी समृद्धी या उपक्रमांच्या माध्यमातून कम्युनिटी पोलीसींगचे पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर काम करणारे अंमलदार आणि V.L.E. यांचे तर्फे आजपर्यंत एकुण 5,19,022 नागरिकांपर्यंत विविध शासकिय योजनांचा लाभ पोहचविणे शक्य झाले आहे.

 

 

सदर कार्यशाळेच्या कार्यक्रम प्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. तसेच कार्यक्रमास नागपूर सर्कलचे डिव्हिजन मॅनेजर (V L.E.) श्री. निलेश कुंभारे, डिस्ट्रिक्ट मॅनेजर (V.L.E.) गडचिरोली श्री. शाहिद शेख, ॲक्सिस बँक मॅनेजर नागपूर सर्कल श्री. अभिजीत डबीर, ॲक्सिस बँक मॅनेजर श्री. विराज देशमुख, ॲक्सिस बँक मॅनेजर श्री. प्रशांत झाडे हे उपस्थित होते.

 

या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here