जिल्ह्यात तिन्ही विधानसभा क्षेत्रात 10 उमेदवारांचे 13 नामनिर्देशन अर्ज दाखल

12

जिल्ह्यात तिन्ही विधानसभा क्षेत्रात 10 उमेदवारांचे 13 नामनिर्देशन अर्ज दाखल

 

गडचिरोली, (s bharat news network) दि.28: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 साठी गडचिरोली जिल्ह्यात आज 10 उमेदवारांकडून एकूण 13 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

67-आरमोरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्र दाखल केले यात कृष्णा दामाजी गजबे (भारतीय जनता पार्टी) यांनी दोन तर प्रा. रमेश गोविंदा मानागडे (अपक्ष) यांनी एक अर्ज दाखल केला आहे.

68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाले. यात भरत मंगरूजी येरमे (वंचित बहुजन आघाडी) यांनी दोन अर्ज दाखल केले तर बाळकृष्ण वंगणुजी सावसाकडे (अपक्ष), डॉ. मिलिंद रामजी नरोटे (भारतीय जनता पार्टी), जयश्री विजय वेळदा (भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष), मनोहर तुळशिराम पोरेटी (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

69-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात आज चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले. यात हनमंतू गंगाराम मडावी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व अपक्ष असे दोन नामनिर्देशनअर्ज भरले. तसेच आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट) व राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत 15 उमेदवारांकडून एकूण 19 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

आज 28 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 5 व्यक्तींनी 12 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 2 व्यक्तींनी 5 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 9 व्यक्तींकडून 10 अर्जाची उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत (28 ऑक्टोबर) एकूण 213 नामनिर्देशन अर्जाची उचल झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here