शिवाजी महाराजां बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालाचा निषेध.
गडचिरोली :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमान करणारे विधान करून जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे. त्याच्या निषेधार्थ राजमुद्रा युवा प्रतिष्ठान गडचिरोलीच्या वतीने आज इंदीरा गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले.
तात्काळ महाराष्ट्र राज्यातून राज्यपाल भगतसिंह कोषारी यांची हाकलण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली.
महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यांची राज्यपाल या घटनात्मक पदाची धुरा सांभाळत असलेले भगतसिंग कोश्यारी यानी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यापूर्वी सुध्दा बेताल वक्तव्य व वादग्रस्त व्यक्तव्य करुन महाराष्ट्रृ राज्यातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा काम सातत्याने राज्यपाल कोषारी यांच्याकडून होत आहे. तथापी यापूढे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्यास शिवप्रमी म्हणून राजमुद्रा युवा प्रतिष्ठाणकडून जसच्या तसं उत्तर देण्यात येईल. भगतसिंग कोश्यारी हे विकृत बुद्धीने वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहे. त्यामूळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही. तरी त्यांनी आपला राजीनामा देऊन उत्तराखंडला जाण्याची वेळ आहे.
आज केलेल्या आंदोलनात राजमुद्रा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रंजीत रामटेके, प्राणतोष बिश्वास, लिलाधर भरडकर, हीमांशू खरवडे, अमरकुमार खंडारे, चेतन गद्देवार, रितीक डोंगरे, सुनिल कन्नोजवार, सागर दडमल, अंशुल बोबाटे, शुभम आकुलवार, रोषन आकुलवार, हितेश निकुरे, पियुष उराडे, सानु कुकुडकर, रानु कुसनाके, इषा मेश्राम, धनंजय सहदेवकर, दिपक दिकोंडावार, चेतन पेंदाम, पराग दांडेकर, संकेत जनगणवार, आदीनाथ मंगर, आदीत्य जावळे, प्रतीक टेकाम, अंकुश झरली, खामेश बोबाटे,नितीन पोटे, अमोल कुमरे, संजय बोधलकर, मिथून नैताम, महेश टिकले, अरविंद डोंगरे आदी युवाप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.