संतांचे विचार अंगीकारून समाजाचा विकास साधावामाजी former mayor नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन 

103

संतांचे विचार अंगीकारून समाजाचा विकास साधावामाजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन

Assertion of former mayor Yogitatai Pipre to develop the society by adopting the thoughts of saints

बोदली येथे संत जगनाडे महाराज जयंती उत्सव

Bhodali -गडचिरोली-gadchiroli-sant shiromani jagnade maharaj  संत शिरोमणी जगनाडे महाराज हे तेली समाजातील एक मोठे समाज सुधारक व समाजासाठी कार्य करणारे महान संत होऊन गेले त्यांच्या कार्य विचारांचा प्रसार व प्रचार करण्याची समाजाला आज गरज असून त्यांचे कार्य सर्व तेली समाजापर्यन्त पोहोचविण्याची आवश्यकता आहे . संताच्या कार्या व विचारांमुळे आपणाला जीवनात समोर जाऊन यशस्वी होण्याचा मार्ग मिळतो आपल्याला मिळालेले ज्ञान व साहित्य वाचनातून आपला आत्मविश्वास वाढतो व आपण कोणतेही काम आत्मविश्वासाने पुण्यत्वास नेऊ शकतो आपला समाज मोठ्या प्रमाणात आहे मात्र समाजामध्ये आजही अज्ञान व अल्पशिक्षण असल्याने आपला समाज मागासलेला आहे या बाबीची दखल घेऊन समाजातील बांधवांनी, तरुण पिढीतील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर विराजमान होऊन आपला विकास करावा व समाजाच्या विकासासाठी परिश्रम घ्यावे. आपल्या तेली समाजात अनेक संत महात्मे होऊन गेले आहेत मात्र त्याची आपल्याला माहिती नसल्याने आपण अज्ञानी बनून जगत आहोत आपल्या तेली समाजातही अनेक संत महात्मे झाली याचा आपल्याला अभिमान असायला हवा व संतांचे कार्य व विचारांनी प्रेरणा घेऊन युवकांनी समोरील वाटचाल करावी व समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले.बोधली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात आयोजित संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज सेवा समिती बोदली जिल्हा गडचिरोलीच्या वतीने येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले, सहउद्घाटक म्हणून प्रा. कामडी सर उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे होते प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे विदर्भ संघटक रमेशजी भुरसे, माजी न. प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बोदलीचे सरपंच आकाश निकोडे उपसरपंच मनिषा कुनघाडकर बोदली ग्रामपंचायत चे सर्वसी सदस्य राकेश चौधरी यामीना चिलंगे, सुजाता पिपरे देवाजी नैताम, राजेंद्र निकुरे विठ्ठल पिपरे अरुण पाटील निकोडे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शालिक भोयर , श्रीराम मोहूर्ले, गणपती पंदीलवार, महारू साखरे रामदास पिपरे धनेश कुकडे विजय कत्रजवार महागुजी पिपरे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराज, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विद्येची देवता माता सरस्वती, भारत माता व माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर अनेक मान्यवरांनी संत जगनाडे महाराज व त्या काळात होऊन गेलेल्या समाजातील संत महात्मांच्या जीवन कार्यावर व विचारांवर प्रकाश टाकला यावेळी बोदलीतील तेली समाज बांधव व नागरिक, महिला व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिवाकर पिपरे यांनी तर आभार तुमदेव नैताम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here