गडचिरोली(Gadchiroli):- जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाविरूद्ध शेतकरी कामगार पक्ष, गडचिरोली यांनी वरिष्ठ स्तरावरील चौकशी बाबत प्रेस नोट काही माध्यमांना दिली आहे. यामधे फक्त शेकापची बोगस तक्रार विविध माध्यमांना फॉरवर्ड केलेली आहे. वरीष्ठ स्तरावरून याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. सदर प्रेस नोट चुकीची असून दुर्भावनापूर्ण हेतू असलेली आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. याबाबत प्रशासनाची जाणून बजून बदणामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामधे कोणतेही तथ्य नसून निव्वळ अफवा आहे. कोणत्याही राज्य शासनाच्या विभागाने याबाबत तसे पत्र दिले नाही. सदर माहिती चुकिची असल्याने कोणीही ती प्रसिद्ध करू नये असे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.
सोर्स जिला माहीती कार्यालय गडचिरोली