ट्रॅकिंग सेलच्या माध्यमातुन अतिजोखमीच्या मातांची पाठपुरावा मोहीम
गडचिरोली,(Gadchiroli)दि.19: आरोग्य विभाग जि.प.गडचिरोली येथे डॉ.दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांच्या संकल्पनेतून व युनिसेफच्या सहकार्याने नविन ट्रॅकिंग सेलची निर्मिती करण्यात आली आहे. या ट्रॅकिंग सेलमधून अतिजोखमीच्या मातांना दुरध्वनीद्वारे फोन करण्यात येतो. या अतिजोखमीच्या मातांचा पाठपुरावा घेण्याबाबत संबंधित आरोग्य सेविका, आशा यांना दुरध्वनीद्वारे कळविण्यात येते. अशी माहीती डॉ.दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. दररोज 50 दुरध्वनी फोन करुन अतिजोखमीच्या मातांचा पाठपुरावा करण्यात येतो. अतिजोखमीच्या मातांना ट्रॅकिंग सेल मधील कार्यरत 4 डाटा एन्ट्री ऑपरेटर फोन करतात. गरज गरोदर मातांना 102 व 108 रुग्णवाहीका ट्रोल फ्री नंबर विषयी माहीती देण्यात येते. गरज पडल्यास घरुन दवाखान्यामध्ये, एका दवाखान्यामधुन दुस-या दवाखान्यामध्ये, दवाखान्यातुन घरी सोडण्यासाठी ANC, PNC, व 0 ते 1 वर्ष वयाच्या बालकांना JSSK Free Transport च्या माध्यमातुन लाभ देण्यात येतो. हिमोग्लोबिन कमी असलेल्या मातांना ग्रामीण रुग्णालयातील उपलब्ध Blood Transfusion सेवेविषयी माहीती देण्यात येते. हिमाग्लोबिन 7 gm % पेक्षा कमी असलेल्या मातांना Iron Sucrose विषयी माहीती देण्यात येते. घरी प्रसुती न करता संस्थेत प्रसुती करण्याविषयी सल्ला देण्यात येतो. जन्मतः व्यंग ओळखण्यासाठी 14 ते 16 आठवडयामध्ये मोफत सोनोग्राफी करण्याचा सल्ला देण्यात येतो. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयोजित मानव विकास शिबिरात जाऊन आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला गरोदर मातेला देण्यात येतो. गरोदरपणातील गंभीर लक्षणांबाबत विचारणा करुन त्वरीत वैद्यकिय अधिकारी यांच्याकडुन तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. जिल्हयातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा देतांना दुर्गमता, दळणवळण सुविधा व गावाचे अंतर अडसर निर्माण करते. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गडचिरोली यांनी सदर ट्रॅकिंग कक्षाद्वारे सर्व गरोदर मातांचे निरंतर पाठपुरावा करुन संस्थेत प्रसुतीचे प्रमाण वाढविण्यासाठी सुचना दिल्या. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील माता व बालमृत्यु कमी होण्यास नक्कीच फायदा होईल. या सर्व सेवेचे सनियंत्रण DRCHO, ADHO, MO DTT व DHO यांच्या मार्फत केले जाते.