गडचिरोली महसुल विभाग व गडचिरोली पोलीस विभाग यांच्यात रंगला क्रिकेटचा मैत्रीपुर्ण सामना

127

गडचिरोली महसुल विभाग व गडचिरोली पोलीस विभाग यांच्यात रंगला क्रिकेटचा मैत्रीपुर्ण सामना

गडचिरोली दि.11/11 2023 जिल्हा हा माओवादग्रस्त असल्याने त्याच्या विकासासाठी गडचिरोली महसुल विभाग व गडचिरोली पोलीस विभाग हे दोन्ही विभाग एकमेकांच्या हातात हात घालुन अथक परिश्रम घेत असतात. या दोन्ही विभागाच्या कार्यामध्ये अधिक समन्वय येऊन विकासकामे प्रभावीपणे पुर्ण करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी श्री. संजय मीना सा. व मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आज दिनांक 11/11/2023 रोजी सकाळी 09:00 वा. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गडचिरोली महसूल विभाग व गडचिरोली पोलीस विभाग यांच्यात मैत्रीपुर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले.

सदरचा क्रिकेट सामना हा पारदर्शक व्हावा यासाठी नागपूर येथील व्हिसीए मैदानावर कार्यरत असलेले प्रशिक्षक व पंच यांना बोलविण्यात आले होते. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकत गडचिरोली पोलीस विभागाचे कर्णधार श्री. नीलोत्पल सा. यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सदर सामन्यामध्ये कर्णणार श्री. संजय मीना सा. यांच्या नेतृत्वात महसूल विभागाकडुन प्रथम फलंदाजी करत श्री. गौरव नहावृते यांच्या अर्धशतकीय 56 धावांच्या खेळीच्या मदतीने 15 षटकांमध्ये एकुण 104 धावसंख्या उभारली. यानंतर जिंकण्यासाठी लागणा­या 105 धावांचा पाठलाग करताना श्री. नीलोत्पल सा. यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस विभाग संघाने श्री. मयुर भुजबळ, श्री. कुंदन गावडे व श्री. किशोर शिंदे यांच्या फलंदाजीच्या जोरावर संघाने 14 व्या षटकात विजय प्राप्त केला.

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या रोमांचक क्रिकेट सामन्यामध्ये 56 धावा करीत उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करणा­या श्री. गौरव नहावृते यांना सामनावीराचा पुरस्कार देऊन मा. जिल्हाधिकारी व मा. पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यानंतर विजेत्या व उपविजेत्या संघातील सर्व खेडाळूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते चषक वितरीत करण्यात आले. सदर सामन्यादरम्यान उपस्थितांकरीता अल्पोपहार, चहा-पाण्याची व जेवनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.

सदर आयोजीत मैत्रीपुर्ण क्रिकेट सामन्यामध्ये मा. जिल्हाधिकारी श्री. संजय मीना सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा., मा. उपजिल्हाधिकारी श्री. धनाजी पाटील सा., मा. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुनिल सुर्यवंशी सा., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मयुर भुजबळ व श्री. साहिल झरकर, उपविभागीय अधिकारी गडचिरोली श्री. विवेक साळुंखे, नगर परिषद गडचिरोलीचे मुख्याधिकारी श्री. सुर्यकांत पिदुरकर, तालुका क्रिडा अधिकारी, गडचिरोली श्री. भास्कर घटाळे, व्हिसीए स्टेडीयम नागपूर येथील स्टेट पॅनल पंच श्री. आशीष बावनकुळे, लेवल ओ कोच श्री. प्रशांत भुपाल व श्री. सचीन मडावी व गडचिरोली जिल्ह्रातील सर्व पत्रकार बंधू हे उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्राच्या विकासासाठी गडचिरोली महसूल विभाग तसेच गडचिरोली पोलीस विभाग हे माओवाददृष्ट्या अतीदुर्गम भागात आपले कर्तव्य पार पाडत असतात. याकरीता दोन्ही विभागामध्ये अधिक समन्वय यावा यासाठी मैत्रीपुर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. विजयी संघाचे अभिनंदन, दोन्ही संघाने अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. आम्ही अधिक धावसंख्या उभारण्याची आवश्यकता होती. सामना हारणे किंवा जिंकणे हे महत्वाचे नसून सामना कसा खेळला हे महत्वाचे.

 

श्री. संजय मीना जिल्हाधिकारी

गडचिरोली महसूल विभाग यांच्यासोबत आयोजीत मैत्रीपुर्ण क्रिकेट सामन्यामध्ये दोन्ही संघाने अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले आहे. आजचा हा विजय कोणत्या एका संघाचा नसून, खेळाचा विजय आहे. आजचा हा सामना आपल्या सर्वांसाठी अविस्मरणीय राहिल. दोन्ही विभागामध्ये या सामन्यामुळे अधिक समन्वय साधून गडचिरोली जिल्ह्राच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करण्यासाठी निश्चीतच मदत होईल.पोलीस अधिक्षक श्री निलोत्पल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here