आदिवासींनी नागरीकासारखे वागावे पोलीस मुख्यालयातील पत्रकार परिषदेमध्ये मैत्री संस्था नागपूर अध्यक्ष संजय भेंडे चे बेताल वक्तव्य
Gadchiroli गडचिरोली दि.17 मार्च 2023 :- शुक्रवारी ठीक चार वाजता sp office gadchiroli पोलीस मुख्यालयात मैत्री संस्था व पोलीस विभाग यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती त्यात येत्या 26 मार्च 2023 रोजी 127 आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा पार पडणार या संबधाने पत्रकार परिषद घेण्यात आली त्या पत्रकार परिषदेमध्ये मैत्री संस्था नागपूर चे अध्यक्ष संजय भेंडे यांचे वक्तव्य असे होते आदिवासी नी नागरीकासारखे वागावे ? म्हणजे कसे वागावे हा सर्वात मोठा प्रश्न चिन्ह असुन हिन भावनेतून शब्दप्रयोग केला गेला आहे
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी चे सामुहिक विवाह सोहळा आयोजित करुन फक्त नी फक्त आदिवासी समाजासाठी आम्ही काही तरी समाज सेवा करीत आहोत असे भासवायचे,आदिवासी क्षेत्रात बऱ्याच स्वयंसेवा संस्था काम करत असुन आजपर्यंत कोणत्याही संस्थेच्या पदाधिकारी यांनी या प्रकारचे वक्तव्य केले नाही, मैत्री संस्था नागपूर च्या अध्यक्ष संजय भेंडे यांनी आदिवासी समाजाबद्दल असी बेताल वक्तव्ये केले कि आदिवासी नी नागरिका सारखे वागावे असा शब्द प्रयोग करुन,आदिवासी नागरिकच नाही ?असा सरळ सरळ शब्दांचा वापर केला आहे,त्यामुळे या मैत्री संस्थेची कायदेशीर रित्या चौकशी करुन संस्थेची नोंदणीच रद्द करावी,व आदिवासी भागात कोणतेही काम,कार्य करण्यास प्रशासनाने तत्काळ मज्जाव घालावेत, जेने करुन आदिवासी च्या भावना दुखावल्या जाणार नाही.पोलीस अधिक्षकांनी याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या मैत्री संस्थेला आदिवासी क्षेत्रात सामाजिक कार्य करण्यास मज्जाव घालावेत.