
२६ नोव्हेंबर 2022 ला संविधान दिन व आम आदमी पार्टीचा स्थापना दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

गडचिरोली:- आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने संविधान दिनानिमित्त तसेच आम आदमी पार्टीचा दहावा वर्धापन दिनानिमित्त आप गडचिरोली जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वाखाली दिंनाक २६ नोव्हेंबर २०२२ मुख्य शहरात जन संपर्क कार्यालय कॅम्प एरिया सुरुवात झाली ते रेड्डी गोडाऊन ते मुख्य मार्ग इंदिरा गांधी चौक येथे संविधान प्रास्ताविक वाचन करण्यात आले तसेच संविधान चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व घोषणा देत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पार्टीचा दहावा वर्धापनदिन दिन व जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांनी संविधान प्रास्ताविक वाचन केले दिन उत्साहात साजरा करण्यात आले यावेळी संघटन मंत्री डॉ देवेंद्र मुनघाटे ,कोषाध्यक्ष संजय जिवतोडे, महिला संयोजक समीता गेडाम ,आदि मान्यवर होते