
सोमनाथ येथील मंदिर परिसरात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते वृक्षारोपन

चंद्रपुर (Chandrapur):- मुल तालुकामुख्यालयापासुन जवळ असलेल्या सोमनाथ येथील प्रसिद्ध शिव मंदिराच्या परिसरामध्ये रोटरी क्लब ऑफ गडचिरोलीच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ गडचिरोलीच्या वतीने सोमनाथ येथे वृक्षारोपण , स्नेह मिलन व वनभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांतजी बोकारे रोटरी क्लबचे अध्यक्ष दिवाकरजी बारसागडे, सचिव नंदूजी काबरा, गीताताई हिंगे यांचे सह रोटरी क्लबचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते
यावेळी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी सोमनाथ येथील या प्रसिद्ध शिव मंदिरामध्ये दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला. यावेळी उपस्थित रोटरी क्लबच्या सदस्यांशी त्यांनी संवाद साधत रोटरी क्लबच्या चालणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती जाणून घेतली