साहिल बनसोड sahil bansod  याची आंतर विद्यापीठ बुद्धीबळ स्पर्धेत दमदार कामगिरी 

88

साहिल बनसोड sahil bansod  याची आंतर विद्यापीठ बुद्धीबळ स्पर्धेत दमदार कामगिरी

चामोर्शी -स्थानिक केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयात बीकॉम तृतीय वर्षात शिकणारा साहिल बनसोड याची गोंडवाना विद्यापीठ बुद्धिबळ संघात निवड झाली .

गोंडवाना विद्यापीठाचा संघ सध्या अमरकंटक येथे पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाला आहे .

या स्पर्धेत केवळरामजी हरडे महाविद्यालयातील साहिल बनसोड याने

दुसऱ्या रया राउंड मध्ये शंकलचंद विद्यापीठ गुजरात

ला हरविले ,तिसऱ्या राउंड मध्ये महाराष्ट्र मस्य विज्ञान विद्यापीठ ला हरविले ,चौथ्या राउंड मध्ये रायसोनी विद्यापीठ मध्यप्रदेश हरविले,पाचव्याराउंड हा गोविंद गुरू विद्यापीठ गोध्रा गुजराथ अनिर्णित ठरला ,सहाव्या राउंड मध्ये नवसारी कृषी विद्यापीठ गुजरात ला हरविले पहिला व सातवा राउंड मध्ये पराभव झाला .सात पैकी 2 पराभव ,1 अनिर्णित व 4 मध्ये विजय अशी दमदार कामगिरी केली.

साहिल बनसोड च्या या दमदार कामगिरी बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर ,शारीरिक शिक्षण संचालक डॉ महेश जोशी आणि यशोदीप संस्था गडचिरोली चे अध्यक्ष अरुण हरडे ,संस्थेच्या सचिव डॉ स्नेहा हरडे यांनी अभिनंदन केले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि खेळाडू विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here