शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज सादर करण्यास 20 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

67

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज सादर करण्यास 20 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

The deadline for submission of Shiv Chhatrapati State Sports Award application has been extended till February 20

santoshbharatnews. Gadchiroli गडचिरोली,)दि.02: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20,2020-21, 2021,22 चे अर्ज सादर करण्यास दि.20 फेब्रुवारी, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या क्रीडा महर्षीचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवत्रछपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. संचालनालयाने दि. 13 जानेवारी,2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्र टिप्पणीद्वारे पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास दि.16 ते 30 जानेवारी, 2023 अशी मुदत केलेली होती. तथापि, या कालावधीत असलेल्या खेलो इंडिया व इतर स्पर्धांच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षणशिबीर व स्पर्धायासाठी अर्ज करण्यास पुरेसा कालावधी न मिळाल्याने पुरस्कार अर्ज सादर करण्यास 20 दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी विनंती राज्यातील विविध क्रीडा संघटना व खेळाडूंनी शासनाकडे केली होती. शासनाने वरील विनंतीचा व वस्तुस्थितीचा सर्वकष विचार करुन दि. 20 फेब्रुवारी,2023 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत पुरस्कार अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. साहसी क्रीडा पुरस्कारासह सर्व क्रीडा पुरस्कारासाठी कामगिरीचा कालावधी त्या पुरस्कार वर्षातील 30 जून रोजी संपणाऱ्या वर्षासह विचारात घेण्यात येईल. पुरस्कारासाठी अर्जाचे नमुने,शासन निर्णय यासाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.inया संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे.पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज / प्रस्ताव अधिक संख्येने सादर करण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली प्रशांत दोंदल, यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here