व्याहाड बुज.येथील मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबियांना खासदार अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वना भेट

161

व्याहाड बुज.येथील मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबियांना खासदार अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वना भेट

तसेच केरोडा येथील भाजपाचे बूथ प्रमुख दिलिपजी चलाख हे मागील अनेक दिवसापासून अपघाताने पायाचे फॅक्चर झाले होते असे कळताच यांची सुद्धा खासदार महोदयांनी भेट घेऊन चांगल्या उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला देऊन धीर दिला.

तालुका प्रतिनिधी

Savali(chandrapur) सावली:- सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील भाजपाचे स्व.विलास श्रावण गेडाम हे इसम आजाराने बरेच दिवसापासून आजारी होते.त्यांचे दोन दिवसा अगोदर मृत्यू झाल्याची माहिती भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते पत्रुजी गेडाम यांनी भाजपा तालुकाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल यांनी खासदार महोदयांना दिली असता या संबंधित तात्काळ दखल घेत मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना खासदार अशोकजी नेते यांनी दिं ०४ मार्च २०२३ ला व्याहाड बुज येथे खासदार अशोकजी नेते यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केलं.

तसेच केरोडा येथील भाजपाचे बूथ प्रमुख दिलिपजी चलाख हे मागील अनेक दिवसापासून अपघाताने पायाचे फॅक्चर झाले होते असे कळताच यांची सुद्धा खासदार महोदयांनी भेट घेऊन चांगल्या उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला देऊन धीर दिला.

त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अविनाश पाल,माजी उपसभापती रविंद्र जी बोल्लीवार, ग्रा.प.सदस्य दिवाकर गेडाम,गुरुदेव भुरसे माजी संचालक कृ.उ.बा.स , ग्रा.प.सदस्य जनार्धन गुरुनुले,ग्रा.प. सदस्या पुष्पाताई ठाकरे,ग्राम.पं. सदस्या वैशालीताई निकेसर,पत्रुजी गेडाम,अरविंद निकेसर, बंडू निकेसर, कान्होजी गेडाम गोविंदा मेश्राम, मोरेश्वर कावडे,काटलाम,ढोलणेजी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here