
Nagpur(maharashtra)नागपुर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर व विदर्भ वनवासी कल्याण आश्रम विदर्भ प्रांत युवा कार्य अंतर्गत अरविंद बाबू देशमुख कॉलेज भरसींगी जिल्हा नागपूर येथे “भारतीय स्वातंत्र संग्रामात जनजाती नायकांचे योगदान” या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पवार , मुख्य वक्ता: श्री. संतोष दुर्वा, कार्यक्रमाचे संयोजक प्रो. भारत मडावी उपस्थित होते. विशेष उपस्थिती उज्वलजी सोयाम, फिरोज जी उईके होते. कार्यक्रमाचे मुख्य वक्ता संतोष दुर्वा यांनी शहरी भागात असलेला लोकांचे दृष्टिकोन आदिवासी समाजाविषयी बदलली पाहिजे.(Image v/s reality) पुढे १८५७ पूर्वीचा इतिहास मांडताना राणी दुर्गावती ते पहाडीया विद्रोह तीलका मांझी, सिद्दो कानो आणि सामूहिक रित्या लढतांना १८५७ च्या कार्यकाळात मुख्य भूमिका व १९ व्या शतकातील क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा ते नागालँड च्य राणी मां गायदेनल्यू. असे अनेक जनजाती नायकांचे स्वातंत्र्य मिळवून देण्यात मुख्य भूमिका होती. असा पद्धतीचा गौरवशाली इतिहास संशोधनाचा माध्यमातून जगासमोर आला पाहिजे असे म्हणाले.अध्यक्ष प्राचार्य Dr. प्रकाश पवार सर यांनी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांचा जीवनावर प्रकाश टाकला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. सुरेश काटे सर, प्रास्ताविक प्रो. भारत मडावी व आभार प्रो. सुरेंद्र सिनकर यांनी केले.
