रमन रोशन मसराम यांचा उद्योग मंत्री .उदयजी सामंत,यांच्या हस्ते जिलाधिकारी कार्यालयात केला सत्कार

146

रमन रोशन मसराम यांचा उद्योग मंत्री .उदयजी सामंत,यांच्या हस्ते जिलाधिकारी कार्यालयात केला सत्कार

गडचिरोली 23/011 :-  जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय(National) बॉक्सिंग स्पर्धा हरियाणा येथे झाली, यात बॉक्सर रमण रोशन मसराम याने कास्यपदक विजयी करून महाराष्ट्राचा आणि गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक केलं…. यासाठी मा. ना. उदयजी सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी, रमण मसराम यांचा सन्मानचिन्ह देऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील क्रीडापटूंना आवश्यकत ते पाठवबड देऊ आणि नॅशनल चॅम्पियन रमणला भविष्याच्या शुभेच्छा देऊन , आम्हाला तुझा अभिमान असल्याच बोलले… रमण रोशन मसराम हा, जिल्हा क्रीडा प्रबोधिनी गडचिरोली चा बॉक्सर असून, प्लॅटिनम स्कूल कॉलेज चां विद्यार्थी आहे… 16/10/23 रोज भंडारा येथे झालेल्या ,महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय(Cbse)स्पर्धेत ,52 ते 56 वजन गट “गोल्ड मेडल “मारून, आपला राष्ट्रीय स्पर्धेत स्थान पक्क केले… दिनांक 16 नोव्हेंबर ते19 नोव्हेंबर 2023 दरम्यान रोज कानिणा खार, महेंद्रगड ,हरियाणा येथे राष्ट्रीय National स्पर्धत, महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत खेळून, कास्य पदक पटकावले. यावेळी भारतातील सगळ्या राज्यातील, राज्यस्तरीय विजयी बॉक्सर खेडले. यावेळी मा. गिरीराज सर ,डेप्युटी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट, हरियाणा राज्य, श्रीमती सुषमा यादव, first Bhim Award आदी मान्यवरांनी भारतातील “नॅशनल विजेतांच” सत्कार केला. रमण रोशन मसराम हा गडचिरोली जिल्ह्यातील पहिला नॅशनल बॉक्सिंग विजेता हा गौरव प्राप्त केला. यावेळी बॉक्सिंग जिल्हा असोसिएशन चे प्रशिक्षक श्री यशवंत कुरूडकर हे उपस्थित होते.. गडचिरोली येथे झालेल्या सत्कार समारंभात मा. संदीपजी बरडे, श्रीमती वर्षा मोरे, हेमंत जम्बेवार, राकेशभाऊ बेलसरे जिल्हाप्रमुख शिवसेना, ,दीपक भारसागडे, रोशन मसराम, मोहिनी मसराम पालक, प्रशिक्षक यशवंत कुरुडकर सर,महेश निलेकर, पंकज मडावी, शंकरअण्णा गैनवार आदी उपस्थित होते…रमण नी आपल्या यशाचं श्रेय आई वडील आणि प्रिशिषक यांना दिलं…विविध क्रिडा  क्षेत्रातुन कौतुकास्पद अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here