
मौजा सोनापूर येथील विकास कामाचे आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन

सोनापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच शेषरावजी कोहळे यांच्या वाढदिवसाचे निमित्य साधून भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन
Sonapor-chamorshi -Gadchiroli :-मौजा सोनापुर येथील स्थानिक विकास निधी अंतर्गत असणाऱ्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे शुभ हस्ते पार पडले.
यावेळी सोनापूरचे उपसरपंच श्री शेषरावजी कोहळे ,उपसरपंच, श्री. अरुण कुनघाडकर, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा प सदस्य, श्री. दिलीपजी चलाख तालुका अध्यक्ष, श्री. साईनाथ बुरांडे तालुका महामंत्री श्री. वसंत कोहळे, श्री. सोयाम, श्री, सातपुते तथा गावातील नागरिक प्रामुख्यानं उपस्थित होते.
सोनापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच शेषरावजी कोहळे यांच्या वाढदिवसाचे निमित्य साधून या विकास कामाचे भूमिपूजन आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आमदार डॉक्टर देवराव जेवढे यांनी उपसरपंच शेषरावजी कोडे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात