मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून दुर्गम भागातील रस्त्यांना प्राधान्य द्या MLA dr.devrao holi आमदार डॉक्टर देवरावजी होळी

98

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून दुर्गम भागातील रस्त्यांना प्राधान्य द्या आमदार डॉक्टर देवरावजी होळी

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंत्यांशी व अधिकाऱ्यांशी केली चर्चा

Gadchiroli :- गडचिरोली जिल्ह्यातील ज्या दुर्गम व अतिदुर्गम भागात उत्तम रस्त्याची उणीव आहे त्या रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या यंत्रणेने कामाला लागावे असे निर्देश आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री सालोडकर यांच्याशी झालेल्या बैठकीमध्ये या विभागाच्या अधिकाऱ्याना दिले.यावेळी कार्यकारी अभियंता श्री चंद्रशेखर सालोडकर, या विभागाचे उपअभियंता, अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार महोदयांनी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागात नसणाऱ्या रस्त्यांना प्राथमिकतेने घेण्याचे निर्देश दिले. विशेषता धानोरा तालुक्यात असणाऱ्या अनेक भागांमध्ये अजूनही चांगल्या रस्त्याची कनेक्टिव्हिटी नसल्याने ते होण्याची आवश्यकता असून ते रस्ते प्राधान्याने घेण्यात यावे असे सुचविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here