महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दिनाचे आयोजन

130

महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला दिनाचे आयोजन

जिला प्रतिनिधी दि.8 मार्च

गडचिरोली (S.P.office  पोलीस मुख्यालया) महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाकडून मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल साो. यांचे मार्गदर्शनाखाली भरोसा सेल यांच्या वतीने दिनांक ०८ / ०३ / २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मपोउपनि वर्षा नैताम, भरोसा सेल यांनी आपले प्रास्ताविकात गर्भातील स्त्री याविषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिला व बाल विकास समितीच्या अध्यक्षा वर्षा मनवर मॅडम यांनी ‘बालकांवरील संस्कार तसेच महिलांना आजच्या युगात कस उभ रहायचं यावर मार्गदर्शन केले तर डॉ. रोशनी किरंगे यांनी महिलांचे आरोग्य व उपाय या विषयावर मार्गदशन केले. तसेच डॉ. पुर्वा तारे मॅडम यांनी स्त्री- पुरूष समानता आणि महिलांनी आर्थिक बाबीवर ज्ञान घेतले पाहिजे या विषयावर मार्गदर्शन करून उपस्थित महिला व शालेय विद्यार्थीनीना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर सौ. दिव्या चिंता मॅडम यांनी स्त्रियाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी अभियोक्ता पल्लवी केदार मॅडम यांनी महिलांविषयक कायदेबाबत मार्गदर्शन केले. तर वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक संगीता वरगंटीवार मॅ. यांनी सुध्दा महिलांविषयी आत्मविश्वास किती मोलाचा असतो या विषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाकरीता समुपदेशीका वैशाली बांबोळे, मिसेस इंडीया २०२१ मनीषा मडावी, प्रोफेशनल इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट शितल मेश्राम (कोसे), मसपोनि रूपाली पाटील मॅडम, मसपोनि पुनम गोरे मॅडम, मपोउपनि संघमित्रा बांबोळे, सौ. वर्षा भुसारी मॅडम, राजेश्री गोहणे मॅडम, भरोसा सेल येथील महिला संफौ लिला सिडाम, मपोहवा शेवंता दाजगाये, मपोहवा लक्ष्मी बिश्वास, मपोना पुष्पा कन्नाके, मपोना सविता उसेंडी, मपोना वत्सला वालदे, व मपोशि सोनम जाभुळकर पोलीस अधीक्षक कार्यालयातील, पोलीस मुख्यालयातील सर्व महिला अंमलदार, उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनाचा आयोजित कार्यक्रमास कार्यालयातील महिला, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थीनी, उपस्थित होत्या. उपस्थित महिला, शालेय विद्यार्थीनीचे भरोसा सेल येथील प्रभारी अधिकारी मपोउपनि वर्षा नैताम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून सर्व महिला व शालेय विद्यार्थीनीना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, उल्हास भुसारी यांचे तर्फे महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल साो. यांनी जिल्हाभरातील सर्व महिला व शालेय विद्यार्थीनीना जागतिक महिला दिनाचा शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here