महिलांचा आधार – सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित

125

महिलांचा आधार – सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित

 

गडचिरोली,()दि.06: संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून “सखी वन स्टॉप सेंटर” ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले आहे.

सखी वन स्टॉप सेंटर या नावाने प्रसिद्ध असलेली ही योजना 1 एप्रिल 2015 पासुन लागू करण्यात आली आहे. सदर योजनेच्या निकषानुसार शारीरीक, लैगींक, भावनिक, मानसिक आणि आर्थिक शोषनाला बळी पडलेल्या अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीसह सर्व महिलांना आवश्यक ती मदत सखी वन स्टॉप सेंटर च्या छताखाली दिल्या जाते.

 

छत एक सेवा अनेक

हिंसाचाराच्या विरोधात लढण्यासाठी एकाच छताखाली अनेक सेवा पीडीत महिला व मुलींसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्यामध्ये वैद्यकीय सेवा, कायदेशीर मदत व समुपदेशन, पोलीस मदत, तात्पुरती निवासाची सोय, मानसिक समुपदेशन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा, रेस्क्यु सर्विसेस व आपतकालीन सेवा यासाख्या विविध सेवांसाठी भटकंती न करता एकाच छताखाली पीडीतेला सर्व सुविधा तात्काळ पुरविल्या जातात.

 

 

केंद्र शासनाच्या अनेक यशस्वी योजनांपैकी सखी वन स्टॉप सेंटर ही एक महत्वपुर्ण व महिलांच्या दृष्टीने उपयोगी असणारी एक यशस्वी योजना ठरली आहे. केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर चे कार्यान्वय व नियंत्रण करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली तथा सदस्य सचिव मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांच्या नियंत्रणात केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर, व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शोषीत व पिडीत महीला व युवतींनी वन स्टॉप सेंटर कडून देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा तथा अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस स्टेशन, रुग्णालय व सामान्य नागरीक यांनी आप-आपल्या कार्यक्षेत्रातील संकटग्रस्त महीला व मुलींना केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली येथे पाठवून सामाजिक जबाबदारी पूर्ण करावी तथा आपल्या आजुबाजुच्या परिसरात अशी पीडीत महिला / मुलगी आढळुन आल्यास खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावार कॉल करुन महिला सक्षमीकरणात योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांचे मार्गदर्शनात सखी वन स्टॉप सेंटर च्या केंद्र प्रशासक संगीता वरगंटीवार व त्यांच्या चमुने केले आहे.

संपर्क कुठे करावा, हेल्पलाईन क्रमांक :- 181, 112, 1098, 1091, 155209, कार्यालय :- 07132-295675, केंद्र प्रशासक :- 9637976915, पत्ता :- जुनी धर्मशाळा, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, मुल रोड,कॉम्प्लेक्स,गडचिरोली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here