भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते वयोवृद्ध महिलांचा सत्कार

123

भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते वयोवृद्ध महिलांचा सत्कार

देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह निमित्त सत्कार समारंभ कार्यक्रम

 

गडचिरोली :-  देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह निमित्ताने स्थानिक रामनगर येथील तुकडोजी चौक येथे अंतोदय धारक(गरीब) वयोवृद्ध महिलांचा भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व आर्थिक मदत देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके,शहर अध्यक्ष कविता उरकुडे,शहर महामंत्री रश्मी बानमारे,पुनम हेमके,रुपाली सातपुते,भावना हजारे,मंदाताई मांडवगडे, छाया श्रीपदवार तसेच भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व वार्डातील नागरिक उपस्थित होते.यावेळी सावित्रीबाई पेंदोरकर,कमलाबाई मारगोनवार,यशोदाबाई कुंठावार,मीराबाई जुवारे,चतुराबाई कोरेवार, चंद्रलेखा राजगडकर,कांता चौधरी,मंजुळाबाई ठाकरे,कमळजा मेश्राम,शकुंतला डोंगे,पार्वताबाई भुसारी,पार्वताबाई भानारकर इत्यादी अंतोदय धारक (गरीब) वयोवृद्ध महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय मांडवगडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here