प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

120

प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी

 

रामकृष्णपूर, राममोहनपूर व रवींद्रपुर येथे पाणी पुरवठा योजनेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन

जलजीवन मिशन अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील गावोगावी पाणीपुरवठा योजना सुरू करणार

चामोर्शी-गडचिरोली chamorshi-Gadchiroli- डॉक्टर देवराव जी होळी यांच्या प्रयत्नातून चामोर्शी तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या असून जल जीवन मिशन अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील गावोगावी पाणीपुरवठा योजना सुरू करून प्रत्येक कुटुंबाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी रामकृष्णपूर राममोहनपुर व रवींद्रपूर येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करताना केले.आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, रामकृष्णपूर येथील सरपंच सौ रतन मंडल ,माजी सरपंच प्रवीण सेन,सुचिता सरकार,सुप्रिया दास, बंगाली आघाडीचे जिल्हा महामंत्री सुशांत रॉय तालुका महामंत्री भोजराज भगतयुवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रतिक राठी राममोहानपूर चे सरपंच प्रकाश मल्लिक, विमल सेन, यांचे सह ग्रामपंचायतचे सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.चामोर्शी तालुक्यात पाणीपुरवठा योजनांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम धूम धडाक्यात सुरू झालेला असून जलजीवन मिशन अंतर्गत गावागावांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर करून प्रत्येक घराला पाणी पोहोचविण्याचे काम आपण करणार असल्याचे याप्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here