पुन्हा एका ईसमाचा वाघाने घेतला बळी

117

 

गडचिरोली:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार गडचिरोली मुख्यालयापासून 15 किलोमीटर अंतरावर आज दिनांक 9 सप्टेंबर 2022 दुपारी 2.30 मिनिटांनी कळमटोला येथील कृष्णा महागु ढोणळ (65) यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले.

कृष्णा महागु ढोणे हे शेळ्या चारण्यासाठी कक्ष क्रमांक 415/p येथे गेले असता त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला करून काही अंतरावर ओढत नेले त्यामध्ये कळमटोला येथील कृष्णा ढोणे जागीच ठार झाले.

त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा आणि ठार झालेल्या ढोणे परिवाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत वनविभागाणे तात्काळ करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here