
पराभवाचे मंथन करून विजयाचे ध्येय निश्चित करा.MLA Dr.devrao holi आ. डॉ. देवरावजी होळी

कुनघाडा येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत समारोप
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण
Kunghada(re)- chamorshi-gadchiroli :- गडचिरोली :-खेळामध्ये कोणत्या ना कोणत्या संघाला पराभव स्वीकारावाच लागतो परंतु त्या पराभवाचा धडा घेवून त्याचे मंथन करून आपल्या विजयाचे पुढील ध्येय ठरविल्यास भविष्यात आपला विजय निश्चित करता येतो असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे MLA आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कुनघाडा येथील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी केले. कुनघाडा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा चामोर्शी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. आनंदभाऊ भांडेकर, भाजपा नेते कंत्राटदार रणछोडजी कलंत्री, मोरेश्वरजी भांडेकर, भाजपा तालुका सचिव श्री. उमेशजी कुकडे, कुनघाडा येथील प्रतिष्ठित मान्यवर संघाचे खेळाडू, क्रिडा प्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विजेत्या संघाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अभिनंदन केले. तसेच ज्यांना विजय मिळवता आला नाही त्यांनी पराभवाने खचून न जाता भविष्यात विजयाचा मार्ग निश्चित करण्याचे ध्येय ठेवून खेळावे असे आवाहन त्यांनी खेळाडूंना केले