नरभक्षक वाघांचा (tiger) तत्काळ बंदोबस्त करा आमदार डॉ.देवरावजी होळी

83

संपूर्ण जिल्ह्यातील नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता,आमदार डॉक्टर देवरावजी होळी

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मयत दशरथ कुणघाडकर यांच्या परिवाराला सात्वनपर भेट

संपूर्ण जिल्हा वाघाच्या दहशतीमध्ये

गडचिरोली(Gadchiroli-chamorshi -kunghada rei)मागील काही महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये नरभक्षक वाघांनी धुमाकूळ घातलेला असून अनेक निष्पाप लोकांचा बळी या नरभक्षक वाघांनी घेतलेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील या नरभक्षक वाघांचा तातडीने बंदोबस्त लावण्याची मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाकडे केली आहे.

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मयत दशरथ कुणघाडकर यांच्या परिवाराला सात्वनपर भेट देऊन आर्थिक सहायता केली. यावेळी मृतकाची पत्नी कांताबाई कुनघाडकर, मुलगा धनराज कुनघाडकर, श्री. मोरेश्वर कुणघाडकर उपसरपंच श्री . विकेश नैताम ग्रा.प.सदस्य, श्री. रवींद्र कुणघाडकर, सौ. ए. एल.मडावी तालुका महामंत्री हेमन्त बोरकुटे, श्री. किशोर गटकोजवार , यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ४० हून अधिक निष्पाप लोकांचा बळी या नरभक्षक वाघांनी घेतलेला असून या नरभक्षक वाघांचा बंदोबस्त लावण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले. आपण आताच वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदनही दिले होते. परंतु पुन्हा लवकरच या संदर्भात मा. वनमंत्र्यांची भेट घेऊन नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करावा अशी विनंती करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here