नगर पंचायतच्या चार विषय समिती निवडणुक अविरोध रॉका व भाजपच्या साथीने काँग्रेसची सरशी

127

नगर पंचायतच्या चार विषय समिती निवडणुक अविरोध रॉका व भाजपच्या साथीने काँग्रेसची सरशी

Nagar Panchayat’s four subject committee election unopposed and Sarshi of Congress along with BJP

तालुका प्रतिनिधी

चामोर्शी:- येथील नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची मुद्दत संपल्यामुळे २० फरवरीला विषय सभापतीपदाची निवडणूक घेण्याकरिता नगर पंचायत सभागृहात सभेचेआयोजन केले होते. त्यात काँग्रेसला राष्ट्रवादीची व भाजपची साथ मिळाल्याने या सभेत विषय समितीच्या सर्व सभापतीची अविरोध निवड करण्यात झाली

मागील वर्षी २१ फरवरी २०२२ रोजी नगर पंचायत च्या विषय समिती निवडणूक घेण्यात आली सर्व चार सभापतींची निवड अविरोध निवड झाली होती यांच्या पदाची मुद्दत संपली असल्याने २० फरवरी२०२३ रोजी १० ते ११ वाजता विषय समिती बांधकाम, स्वच्छता, पाणी पुरवठा व महीला बालकल्याण या सभापती उपसभापती पदासाठी प्रत्येकी ऐक ऐक नामांकन दाखल करण्यात आले होते

दुपारी तीन वाजता पिठासिन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली व नायब तहसीलदार राजू वैद्य , अधीक्षक मोरेश्वर पेंदाम, कर निरीक्षक भरत, अभियंता निखिल कारेकर, सभा लिपिक दिलीप लाडे आदीच्या उपस्थित पार पडलेल्या विषय समितीच्या विशेष सभेत काँग्रेसचे नगरपंचायत उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे यांची दुसऱ्यांदा स्वच्छता , वैद्यक व आरोग्य सभापती पदी तर दुसऱ्यांदा काँग्रेसचे बांधकाम सभापती पदी म्हणून वैभव भिवापूरे यांची , तर पाणी पुरवठा व जल निस्तारन सभापती म्हणून राष्ट्रवादीचे निशांत नैताम तर. महीला व बाल कल्याण सभापती म्हणून भाजपच्या गीता सोरते तर महीला व बालकल्याण उपसभापती पदी काँग्रेसच्या स्नेहा सातपुते यांची अविरोध झाली असल्याचे जाहीर करण्यात आले.

याप्रसंगी नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, सोनाली पिपरे, सुमेध तुरे, गीता सोरते, स्नेहा सातपुते , वैभव भिवापुरे, नितीन वायलालवार, वर्षा भिवापूरे, प्रेमा आईंचवार, माधुरी व्याहाडकर, निशांत नैताम, , काजल नैताम, वंदना गेडाम, रोशनी वरघटे, राहुल नैताम, आदी स्वीकृत नगरसेवक लौकिक भिवापूरे. आशिष पिपरे उपस्थित होते. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, माजी सभापती विजय शातलवार, राजेश ठाकूर, गुरुदास सातपुते, सिद्धार्थ सोरते , पुरण व्ह्याहाडकर, पोषक गेडाम, विनोद पेशत्तीवार, तानाजी धोडरे, शुभम बंनपुरकर, लक्ष्मण रामटेके, निक्कु झलके व नगर पंचायत कर्मचारी आदींची उपस्थिती होती यावेळी पोलीस बंदोबस्त होता.

बाक्स :- नवनिर्वाचित बांधकाम सभापती. वैभव भिवापूरे, स्वच्छता, वैद्यक व आरोग्य सभापती चंद्रकांत बुरांडे, पाणीपुरवठा सभापती निशांत नैताम तर महीला व बालकल्याण सभापती पदी गीताताई सोरते व उपसभापती स्नेहा सातपुते यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी त्यांचेअध्यक्ष जयश्री वायलावार व कार्यकर्त्य व कर्मचाऱ्यांकडून स्वागत व अभिनंदन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here