देशाचे गृहमंत्री मान.अमितजी शहा यांचा दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी खासदार अशोक नेते  व आमदार डॉं देवराव होळी यांची पत्रकार परीषदेत माहीती

280

देशाचे गृहमंत्री मान.अमितजी शहा यांचा दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी खासदार अशोक नेते  व आमदार डॉं देवराव होळी यांची पत्रकार परीषदेत माहीती

 

दि.३० नोव्हेंबर २०२३

गडचिरोली:-शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे पत्रकार परिषद खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या पत्रकार परिषदेत खासदार अशोक नेते यांनी माहिती देतांना ९ डिसेंबर २०२३ रोजी देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांचा गडचिरोली दौरा असून या दौऱ्याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक विविध विकास कामांचे व प्रकल्प प्रोजेक्टचे भुमिपुजन करण्यात येतील.हा दौरा माझ्या प्रयत्नाने व विनंतीला मान देत दौरा झालेला आहे.मागील दौरा १८ तारखेला होता पण तेलगांना राज्यात निवडणूकीत व्यस्त असल्याने रद्द झाले. पण आता माझ्याच प्रयत्नाने ९ डिसेंबर २०२३ चा दौरा निश्चित झाला असून यात कोनसरी येथील प्रोजेक्ट प्रकल्पाचे व वडसा गडचिरोली रेल्वे लाईन चा भुमिपुजन, चिचडोह बँरेजेस प्रकल्पाचे लोकार्पण समारंभ सोहळा संपन्न होणार..

तसेच कृषी वीज धारक शेकऱ्यांसाठी बारा तास वीज उपलब्ध होणार अशी माहिती पत्रकार परिषदेत खासदार अशोक नेते यांनी दिली.यावेळी पत्रकार परिषदेला प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,आमदार डॉ.देवराव होळी,प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जेष्ठ नेते बाबुराव कोहळे,तालुकाध्यक्ष विलास भांडेकर,जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी,माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,महिला आघाडीच्या महामंत्री वर्षा शेडमाके, तालुका महामंत्री बंडू झाडे,उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here