जिल्ह्यात Gadchiroli Distric 115 धान खरेदी केंद्रे सुरु

68

जिल्ह्यात 115 धान खरेदी केंद्रे सुरु

गडचिरोली,(Gadchiroli) दि.25 : गडचिरोली जिल्हयातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन, अन्ऩ, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, शासन निर्णय क्र. : खरेदी 1222/ प्र.क्र. 134/ना.पु.29, दिनांक – 19 ऑक्टोबर, 2022 अन्वये धान खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार गडचिरोली जिल्हयातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा या हेतुने बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑप.मार्केटिंग फेडरेशन यांचेमार्फत 24 धानखरेदी केंद्र व आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य़ सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. गडचिरोली यांचेमार्फत 53 धान खरेदी केंद्रे व उप प्रादेशिक व्यवस्थापक, (उच्च श्रेणी), अहेरी यांचेमार्फत 38 असे एकूण 115 धान खरेदी केंद्रे सुरु करण्याकरिता जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी मान्यता दिलेली असून या सर्व केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली आहे.

धान खरेदीचा कालावधी :-
खरीप पणन हंगाम – दिनांक 19 ऑक्टोबर, 2022 ते 31 जानेवारी, 2023.

अभिकर्ता संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य़ सह. आदि. वि. महामंडळ मर्या., गडचिरोली (आदिवासी क्षेत्रासाठी)

अ. क्र. खरेदी केंद्राचे ठिकाण अ. क्र. खरेदी केंद्राचे ठिकाण अ. क्र. खरेदी केंद्राचे ठिकाण
तालुका केंद्र तालुका केंद्र तालुका केंद्र
1 कोरची कोरची 20 कुरखेडा गेवर्धा 39 धानोरा पेंढरी
2 कोरची मसेली 21 कुरखेडा देऊळगाव 40 धानोरा मोहली
3 कोरची बेतकाठी 22 कुरखेडा सोनसरी 41 धानोरा सोडे
4 कोरची मर्केकसा 23 कुरखेडा खरकाडा 42 धानोरा चातगाव
5 कोरची कोटगुल 24 कुरखेडा नान्ही 43 धानोरा गट्टा
6 कोरची बेडगाव 25 कुरखेडा उराडी 44 धानोरा सुरसुंडी
7 कोरची चर्वीदंड 26 कुरखेडा अंगारा 45 चामोर्शी घोट
8 कोरची कोटरा 27 आरमोरी देलनवाडी 46 चामोर्शी मक्केपल्ली
9 कोरची बोरी 28 आरमोरी दवंडी 47 चामोर्शी भाडभिडी
10 कुरखेडा रामगड 29 आरमोरी कुरुंडीमाल 48 चामोर्शी सोनापूर
11 कुरखेडा येंगलखेडा 30 वडसा पिंपळगाव 49 चामोर्शी आमगाव
12 कुरखेडा मालेवाडा 31 गडचिरोली मौशीखांब 50 चामोर्शी मार्कंडा
13 कुरखेडा पुराडा 32 गडचिरोली पोटेगाव 51 चामोर्शी पावीमुरांडा
14 कुरखेडा खेडेगाव 33 गडचिरोली चांदाळा 52 चामोर्शी रेगडी
15 कुरखेडा कुरखेडा 34 धानोरा धानोरा 53 चामोर्शी गिलगाव
16 कुरखेडा कढोली 35 धानोरा मुरुमगांव
17 कुरखेडा आंधळी 36 धानोरा रांगी
18 कुरखेडा पलसगड 37 धानोरा दुधमाळा
19 कुरखेडा गोठणगांव 38 धानोरा कारवाफा

अभिकर्ता संस्थेचे नाव – उप प्रादेशिक व्यवस्थापक, (उच्च श्रेणी) आदिवासी विकास महामंडळ मर्या., अहेरी (आदिवासी क्षेत्रासाठी)
अ. क्र. खरेदी केंद्राचे ठिकाण अ. क्र. खरेदी केंद्राचे ठिकाण अ. क्र. खरेदी केंद्राचे ठिकाण
तालुका केंद्र तालुका केंद्र तालुका केंद्र
1 अहेरी बोरी 13 सिरोंचा अमरादी 25 भामरागड मन्नेराजाराम
2 अहेरी कमलापुर 14 सिरोंचा अंकिसा 26 एटापल्ली एटापल्ली
3 अहेरी वेलगुर 15 सिरोंचा वडधम 27 एटापल्ली गट्टा
4 अहेरी इंदाराम 16 सिरोंचा पेंटीपाका 28 एटापल्ली तोडसा
5 अहेरी उमानुर 17 सिरोंचा जाफ्राबाद 29 एटापल्ली घोटसुर
6 अहेरी आलापल्ली 18 सिरोंचा रोमपल्ली 30 एटापल्ली कसनसुर
7 अहेरी पेरमिल्ली 19 सिरोंचा बामणी 31 एटापल्ली जारावंडी
8 अहेरी देचलीपेठा 20 सिरोंचा विठ्ठलरावपेठा 32 एटापल्ली गेदा
9 मुलचेरा मुलचेरा 21 भामरागड भामरागड 33 एटापल्ली हालेवारा
10 सिरोंचा सिरोंचा 22 भामरागड लाहेरी 34 एटापल्ली हेडरी
11 सिरोंचा झिंगानुर 23 भामरागड ताडगांव
12 सिरोंचा असरअल्ली 24 भामरागड कोठी

अभिकर्ता संस्थेचे नाव – महाराष्ट्र स्टेट को-ऑप.मार्केटिंग फेडरेशन, गडचिरोली (बिगर आदिवासी क्षेत्रासाठी)

अ.क्र. सब एजन्ट़ संस्थेचे नाव धान खरेदी केंद्राचे ठिकाण
तालुका केंद्र
1 चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री, चामोर्शी चामोर्शी चामोर्शी
2 कृषी औद्योगिक सहकारी खरेदी विक्री संस्था कुरखेडा गडचिरोली गडचिरोली
3 चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री, चामोर्शी चामोर्शी येनापूर
4 चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री, चामोर्शी चामोर्शी सुभाषग्राम
5 चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री, चामोर्शी मुलचेरा विवेकानंदपुर
6 चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री, चामोर्शी मुलचेरा मथुरानगर
7 चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री, चामोर्शी मुलचेरा सुंदरनगर
8 चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री, चामोर्शी चामोर्शी कुनघाडा
9 चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री, चामोर्शी चामोर्शी गणपुर
10 चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री, चामोर्शी चामोर्शी आष्टी
11 सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था, आरमोरी आरमोरी आरमोरी
12 सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था, आरमोरी आरमोरी वैरागड
13 सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था, आरमोरी आरमोरी वडधा (बोरी)
14 सहकारी खरेदी विक्री संस्था वडसा वडसा वडसा
15 सहकारी खरेदी विक्री संस्था वडसा वडसा कोरेगाव (चोप)
16 सहकारी खरेदी विक्री, चामोर्शी चामोर्शी घोट
17 सहकारी खरेदी विक्री संस्था वडसा वडसा किन्हाळा
18 सहकारी खरेदी विक्री संस्था वडसा वडसा सावंगी
19 कृषी औद्योगिक सहकारी खरेदी विक्री संस्था कुरखेडा गडचिरोली अमिर्झा
20 कृषी औद्योगिक सहकारी खरेदी विक्री संस्था कुरखेडा गडचिरोली बोदली
21 वि. सहकारी भात गिरणी घोट चामोर्शी घोट
22 राष्ट्रसंत बहुउद्देशिय अभिनव सेवा संस्था, कोरेगांव वडसा कोरेगांव चोप
23 खरेदी विक्री संस्था, मुलचेरा मुलचेरा भगतनगर
24 अन्नपुर्णा बहुउद्देशिय सर्वसाधारण सहकारी संस्था, चामोर्शी चामोर्शी क्रिष्णानगर
+
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीचे दर हे ‘अ’ दर्जाचे धानाकरिता प्रति क्विं. रु. 2060/- व साधारण धानाकरिता प्रति क्विंटल रु. 2040/- असे शासनाने ठरवून दिलेले आहे.

धान/भरडधान्य विक्रीकरीता शेतकऱ्यांनी त्यांचे केंद्रावर ऑनलाईन नोंदणी (NeMLवर) करणे आवश्यक असून दिनांक 30.11.2022 अखेरपर्यंत NeML पोर्टलवर नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यान्वये जिल्ह्यातील सर्व धान व भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत ऑनलाईन पोर्टलवर (NeML) नोंद करावी.
तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खाजगी व्यापारी / दलाल / मध्यस्थांची मदत न घेता थेट शासकीय खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी. तथापि, धान उत्पादक शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना खुल्या बाजार दरांनी धानाचे विक्री केली असल्यास त्यांना चालु वर्षाचा नमुना 7/12 व बँक खात्यांचा तपशील देणे टाळण्यात यावे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here