जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी

66

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी

 

गडचिरोली,()दि.07: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 6 डिसेंबर रोजी भारतात साजरी केली जाते, ज्याला महापरिनिर्वाण दिवस असेही म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते आणि त्यांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ म्हणूनही ओळखले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. अशा महामानवास कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमाला उपस्थित प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री विनोद पाटील,विधी सल्लागार अधिकारी सारिका वंजारी,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले,परीर्विक्षा अधिकारी विलास ढोरे, बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेणगुरे,प्रियंका आसुटकर,संरक्षण अधिकारी पुरुषोतम मुजुमदार, जयंतजथाडे, रविंद्र बंडावार, पूजा धमाले, उज्वला नाखाडे, सुनीता पिंपळशेटीवार, प्रणाली सुर्वे, मोनिका वासनिक, रितेश थमके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here