गोकुलनगर येथे गुरुनानक साहिब जयंती महोत्सव साजरा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व प्रमोदजी पिपरे यांची उपस्थिती

105

गोकुलनगर येथे गुरुनानक साहिब जयंती महोत्सव साजरा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व प्रमोदजी पिपरे यांची उपस्थिती

गडचिरोली(Gokulnagr -Gadchiroli)गुरुद्वारा श्री गुरुनानक कमिटी गोकूळनगर गडचिरोलीच्या वतीने आज दि. 8 नोव्हेंबर 2022 रोजी गुरुनानक साहिबजी यांचा जयंती महोत्सव गोकुळनगर येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी गडचिरोली च्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी गोकुळनगर येथील गुरुद्वारा येथे जाऊन गुरूनानक साहिबजीच्या चरणी माथा टेकला व आशीर्वाद घेतले. यावेळी गुरुनानक कमिटीच्या वतीने माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व प्रमोदजी पिपरे यांचा दुपट्टा देऊन सत्कार केला. याप्रसंगी बजरंग दलाचे सहसंयोजक बंटीभाऊ खडसे, युवा मोर्चा चे जिल्हा सचिव निखील चरडे, युवामोर्चा चे शहर महामंत्री हर्षल गेडाम, मंगेश रणदिवे, सुभाष उप्पलवार, बालाजी भांडेकर, जनार्धन भांडेकर, अनुराग प्रमोदजी पिपरे, ऋषी पिपरे,गोल्डी वासेकर गुरूंनानक कमिटीचे रामसिंग दुधानी, मंगलसिंग पटवा, गुमानसिंग पटवा, जर्नालसिंग पटवा, गुरुदेवसिंग दुधानी, गुल्लुसिंग दुधानी, राजुसिंग दुधानी, राजेंद्र सिंग पटवा, सुनिपजी पटवा, कृपालसिंग पटवा, जुगनू पटवा, संतोष जैनवार तसेच कमिटीचे अन्य सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या व आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असून समोरही आपल्या अडचणी- समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी सर्व महिलांची भेट घेऊन विचारपूस केली व त्यांच्या अडी- अडचणी जाणून घेऊन महिलांसाठी प्राधान्याने शौचालय बांधून देण्याची ग्वाही दिली व इतरही समस्या येणाऱ्या काळात सोडविण्याचे आश्वासन समाज बांधवांना दिले. यावेळी समाजाचे सर्व सदस्य, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here