गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना शून्य टक्के रॉयल्टीने रेती उपलब्ध करून देणार MLA Dr.Devrao holi आमदार डॉ देवरावजी होळी

98

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना शून्य टक्के रॉयल्टीने रेती उपलब्ध करून देणार MLA Dr.Devrao holi आमदार डॉ देवरावजी होळी

मौजा गिलगाव जमीनदारी येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले शून्य टक्के रॉयल्टीचे वितरण

शासकीय योजनांचा लाभ देय असलेल्या सर्व योजनांना मोफत रेती मिळवून देणार

मोफत रेतीच्या ट्रॅक्टरला झेंडी दाखवून घरकुल लाभार्थ्यांना पोहचता केली रेती

Gilgav-gadchiroli  गिलगाव जमीनदारी येथे आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून मोफत रेतीचा लाभ मिळाला असून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व गरजू घरकुल लाभार्थ्यांना शून्य टक्के दराने मोफत रेतीचा लाभ मिळवून देणार असल्याचं प्रतिपादन MLA Dr.devrao Holi  आमदार डॉ देवरावजी होळी यांनी मौजा गिलगाव (जमी.) येथे आज 0 % रॉयल्टीचे वितरण करताना केले. यावेळी त्यांनी शून्य टक्के रॉयल्टीच्या रेती भरलेल्या ट्रॅक्टरला झेंडे दाखवून घरकुल लाभार्थ्याकडे रेती पोहचता केली. चामोर्शी भाजपा तालुका भाजपाध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेशजी शहा, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे,, तालुका मूरखळा मालचे सरपंच भास्करजी बुरे , ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव ,यांचे सह पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून द्यावी यासाठी आपण वारंवार शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. त्याला यश मिळाले असून लवकरच सर्वच लाभार्थ्यांना मोफत रेती उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here