गडचिरोलीत 127 आदिवासी समाजातील युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा

69

गडचिरोलीत 127 आदिवासी समाजातील युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा

 

गडचिरोली :- 26 मार्च

 

गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी व मैत्री परिवार संस्था नागपूर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील अभिनव लॉन येथे दिनांक 26 मार्च रोजी आदिवासी समाजातील युवक-युवतींचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्रजी कोठेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आम. डॉ देवरावजी होळी, आम कृष्णाजी गजबे,पोलिस विभागाचे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ संदीप पाटील, आयुक्त राजकमल, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे,  जिल्हा पोलीस अधीक्षक निलोतपल सर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता , अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुज तारे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिलडा व मैत्री संस्थेचे पदाधिकारी व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते

  या सामूहिक विवाह सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम क्षेत्रातील 127 आदिवासी समाजातील युवक युवतींचा व 8 आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दाम्पत्याचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी खासदार अशोक नेते , जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी सामूहिक विवाह प्रसंगी उपस्थिती दर्शवून नवं दाम्पत्याना शुभ आशीर्वाद व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here