गडचिरोलीत उद्या भाजपचा जिल्हा महिला मेळावा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे योगीताताई पिपरे यांचे आवाहन

76

गडचिरोलीत उद्या भाजपचा जिल्हा महिला मेळावा

महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे योगीताताई पिपरे यांचे आवाहन

गडचिरोली :- 13 नोव्हेंबर

Suman and sabhagru -armori road Gadchiroli भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने उद्या दि 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात भव्य जिल्हा महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या , महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या स्त्री शक्ती तथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. चित्राताई वाघ ह्या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणुन खास. अशोक नेते, आम. डॉ देवरावजी होळी, आम कृष्णाजी गजबे, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिला संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार , जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, प्रशांतजी वाघरे, गोविंदजी सारडा, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये तसेच भाजपचे सर्व आघाडी/ मोर्चा चे जिल्हाध्यक्ष, महामंत्री उपस्थित राहणार आहेत.*

 

*महिला मेळाव्याला जिल्ह्यातील व गडचिरोली शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन स्त्री शक्ती मा. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री अर्चनाताई ढोरे, भारतीताई इष्ठाम, वर्षाताई शेडमाके, जिल्हा सचिव गीताताई हिंगे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, वडसाच्या माजी नगराध्यक्ष शालूताई दंडवते, प्रितीताई शंभरकर, पायलताई कोडाप, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, वैष्णवीताई नैताम, लताताई लाटकर , निताताई उंदिरवाडे, नीलिमा राऊत, अर्चनाताई निंबोड, पूनम हेमके, भावनाताई हजारे, रश्मीताई बाणमारे, कोमल बारसागडे तसेच भाजपा जिल्हा व शहर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here