कमलापूर-पातानील हत्ती कॅम्प वाचवण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली च्या वतीने मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

210

कमलापूर-पातानील हत्ती कॅम्प वाचवण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली च्या वतीने मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

 

गडचिरोली:- जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेले एकमेव कमलापूर येथील हत्ती कॅम्प चे हत्ती गुजरात राज्यातील एका खाजगी प्राणी संग्रहालयात नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र जिल्याभरात त्याचा विरोध झाला या पूर्वीही काँग्रेसच्या वतीने कमलापूर येथे जाऊन मोठे आंदोलन करण्यात आले आणि महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील हतींचे स्थलांतर थांबवले. राज्यात सत्ता पालट झाली राज्य सरकार आली व त्या सरकारने हत्तीच्या स्थलांतराला हिरवा कंदील दिला व अर्ध्या रात्री जिल्ह्यातील पातानील मधील 3 हत्ती चोराप्रमाणेच चोरून नेले. व आता कमलापूर येथील हत्ती नेण्याच्या तयारीत होते. त्यावेळी केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध काँग्रेस ने आंदोलन केले असता भाजप खासदार – आमदारांनी जिल्ह्यातील हत्ती आपण कुठेही जाऊ देणार नाही असे बोलले मात्र आता पक्ष श्रेष्टींच्या दबावाने की काय पण पातानील येथील हत्ती चोरीला गेले असता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्पच आहे. नुकताच नागपूर उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला चपराक देत हत्तींच्या स्थलांतरावरून ताशेरे ओढले आहे. तरीही हे सरकार गप्प असल्याने जिल्हा काँग्रेस च्या वतीने राज सरकारचा आणि केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आले. त्याचप्रमाणे पातानील येथील 3 हत्ती अर्ध्या रात्री गुजरातला घेऊन गेल्या प्रकरणी मुख्य वनसंरक्षक कार्यालया समोर जवाब दो आंदोलन करन्यात आले.

यावेळी जिला कॉग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हण वाडे  सतिश विधाते, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, अतुल मल्लेलवार,

सोशल मीडिया प्रदेश सचिव दिलीप घोडाम पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, अनुसूचित जाती अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, रोजगार स्वयंम रोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, अनिल कोठारे, काशिनाथ भडके, हरबाजी मोरे, भैयाजी मुद्दमवार, सुभाष धाइत, तुषार मडावी, अमोल भडांगी, रमेश धकाते, प्रभाकर कुबडे, रुपेश टिकले, लालाजी सातपुते, बंडोपंत चिटमलवार, माजिद स्ययद, नृपेश नांदनकर, दीपक रामने, आय.बी.शेख, अब्दुल पंजवाणी, वसंत राऊत, ढिवरू मेश्राम, कुणाल पेंदोरकर, कमलेश खोब्रागडे, विद्याताई कांबळे, कल्पना नंदेश्वर, पौर्णिमा भडके, गौरव येणपरेड्डीवार, कुणाल ताजने जावेद खान,मयुर गावतुरे, जितेंद्र मूनघाटे, घनश्याम मुरवतकर,सह शेकडोंच्या संख्येने जिल्ह्यातील वन्यजीव व पर्यावरण प्रेमी आणि काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here