आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडून तेली समाजाचा अपमान नाही.तेली समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेतून स्पटोक्ती

742

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडून तेली समाजाचा अपमान नाही.तेली समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेतून स्पटोक्ती

ओबीसी व तेली समाज नेहमीच आमदार डॉ देवराव जी होळी त्यांच्या पाठीशी

 

आशिष पिपरे हा केवळ जातीय घटक तो म्हणजे काही संपूर्ण तेली समाज नाही

गडचिरोली,:-  ८ सप्टेंबरला वर्गणी मागण्यास गेलेल्या आशिष पिपरे व तेली समाजाच्या युवकांचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अपमान केला अशी बातमी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली. मात्र आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडून तेली समाजाचा कोणत्याही प्रकारे अपमान करण्यात आला नसून आशिष पिपरे यांनी वैयक्तिक द्वेषापोटी व स्वार्थापोटी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्यावर असे खोटे , निराधार व बदनामीकारक आरोप केले आहेत. त्याने सोशल मीडियावरून प्रसारित केलेल्या बातम्यांचे तेली समाज समर्थन करीत नसल्याचे स्पष्टीकरण चामोर्शी येथे तेली समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले.

यावेळी पत्रकार परिषदेला भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकरराव भांडेकर, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री तथा मुरखळा मालचे सरपंच भास्करराव बुरे , तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे, तालुका सचिव उमेश कुकडे, सोनापूरचे उपसरपंच शेषराव कोहळे, ज्येष्ठ नेते जयरामजी चलाख, दिपकभाऊ वासेकर, काशिनाथ मारुती बुरांडे ,विजय सातपुते ,संजय चलाख, लोमेश श्रीराम सातपुते , विठ्ठल सातपुते, शिवरामजी बारसागडे लक्ष्मण वासेकर यशवंत श्रीकांडे, मंगेश खांडेकर रामचंद्र वखाडे, महेश वैरागडे, यांचेसह बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, युवा मोर्चाचे प्रतीक राठी, तालुका महामंत्री विनोद गौरकार, भुवनेश्वर चौधरी, गुलाल मंडल, पानिपत मंडल, नरेंद्र पोरटे ,पुरुषोत्तम बोरकुटे, विनोद पे, भाऊजी डहलकार, नरेश अलसावार , निरज रामागुंडवार प्रामुख्याने उपस्थित होते.

आशिष पिपरे याने मी म्हणतो तेवढी वर्गणी तुम्ही द्या नाहीतर तुम्हाला पाहून घेऊ अशी धमकी दिली तरीही आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी इतरांप्रमाणे त्यांनाही वर्गणी देवू केली. मात्र आशिष पिपरे याने आमदार महोदयांना अपशब्द बोलल्याने त्यांनी त्याला सर्वांसमोर बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे हा माझाच अपमान नाही तर संपूर्ण तेली समाजाचा अपमान आहे असा कांगावा केला. त्याची कोणीही दखल न घेतल्याने अखेर त्याने वॉर्डातील काहीं मुलांना सोबत घेवून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी संपूर्ण तेली समाजाचा अपमान केला असा असे खोटे व निराधार आरोप करीत जातीय तेढ निर्माण करणारे वातावरण तयार केले. कारण नसतानाही त्यांच्या विरोधात त्यांच्या निषेधाच्या घोषणा, बॅनर जाळपोळ , बदनामीकारक फोटो, व्हिडिओ , बातमी लेख , व्हाट्सअप ,फेसबुक, इंस्टाग्राम व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रसारित केले असून त्याने वैयक्तिक द्वेषापोटी व राजकीय हव्यासापोटी संपूर्ण तेली समाजाला वेठीस धरले आहे. त्यामुळे तेली समाज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचा निषेध करीत आहे.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कधीही तेली समाजासंदर्भात अपमान करणारे एकही वक्तव्य केले नाही. त्यांनी नेहमीच आपल्या तेली समाजाचा सन्मान केलेला आहे. त्यांनी आपल्या या कार्यकाळामध्ये नगरपरिषद, जिल्हा परिषदेमध्ये तेली समाजाचे नेतृत्व दिलेले आहे. त्यांनी नेहमीच तेली समाज बांधवांच्या हिताच्या रक्षणाच्या दृष्टीने ओबीसी समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने विधानसभेत आवाज उठवलेला आहे.

असे असताना आशीष पिपरे केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्यावर असलेल्या वैयक्तिक द्वेषातून जाणीवपूर्वक बदनामी करीत आहे. आशिष पिपरे हा तेली समाजाचा केवळ एक जातीय घटक आहे. तो म्हणजे काही संपूर्ण तेली समाज नाही. त्यामुळे त्याने आपला द्वेष आपल्यापुरते मर्यादित ठेवावा त्याचा तेली समाजाशी संबंध जोडू नये

तेली समाज हा नेहमीच आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठीशी राहिला असून मागील दोन निवडणुकीमध्ये त्यांना या समाजाने भरघोस मतांनी निवडून दिलेले आहे . त्यामुळे आशिष पिपरे यांनी आपली मर्यादा ओळखून आरोप करावे आपला राजकीय व वैयक्तिक द्वेष स्वतःपूर्ती मर्यादित ठेवावा त्यासाठी संपूर्ण तेली समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये. असे प्रतिपादन तेली समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here