आधारभूत धान खरेदी साठी गडचिरोली जिल्हयाची धान उत्पादक्ता वाढणार. कृषी मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी दिले जिल्हा कृषी अधीक्षक गडचिरोली यांना निर्देश.

74

आधारभूत धान खरेदी साठी गडचिरोली जिल्हयाची धान उत्पादक्ता वाढणार. कृषी मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी दिले जिल्हा कृषी अधीक्षक गडचिरोली यांना निर्देश.

 

Armori-Gadchiroli-  आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी करीता जिल्हा प्रशासनाने यापूर्वी जिल्ह्यातील धान उत्पादकता केवळ ९.६० क्विंटल प्रति एकर निर्धारीत केली होती. त्यामुळे आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी आधारभूत धान खरेदी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे MLA krushna Gajbe आमदार कृष्णा गजबे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना पत्र लिहून जिल्ह्यातील धान उत्पादकता वाढविण्याची मागणी केली होती. परंतु कार्यवाही न झाल्याने आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे कृषिमंत्री नामदार अब्दुल सत्तार व अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार रविंद्र चव्हाण यांची काल मंत्रीमंडळ बैठकी नंतर भेट घेऊन आधारभूत धान खरेदी योजनेसाठी आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादकता किमान हेक्टरी ४० क्विंटल ठरविण्याची निवेदनातुन मागणी केली. त्यावर कृषी मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हा कृषी अधीक्षक गडचिरोली यांना फोनवरून आमदार कृष्णा गजबे यांनी केलेल्या मागणीनुसार कार्यवाही करण्याचे सांगुन निवेदनावर सुद्धा कार्यवाही करण्याचे लेखी निर्देश दिलेले आहेत. तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार रविंद्र चव्हाण यांनी सुद्धा जिल्हाधिकारी गडचिरोली यांना जिल्हयाची धान उत्पादकता वाढविण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून लवकरच जिल्हयाची धान उत्पादकता वाढुन शेतकऱ्यांना आधारभुत धान खरेदी योजनेचा लाभ घेता येईल असे आमदार कृष्णा गजबे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here