
अभाविप विदर्भ प्रांताकडून स्व.यशवंतराव केळकर युवा पुरस्कारने सन्मानित श्री.नंदकुमार पालवे यांना अभाविप ध्येय यात्रा पुस्तक देऊन शुभेच्छा देण्यात आल्या

बुलढाणा- Buldhana सेवा संकल्प प्रतिष्ठान बुलडाणा चे संस्थापक श्री.नंदकुमार पालवे अभाविप द्वारे दिला जाणाऱ्या यशवंतराव केळकर युवा पुरस्काराने सन्मानित, दरवर्षी 40 वर्ष्या खालील व्यक्तीला ज्यांनी समाजामध्ये विशेष सेवाकार्य केले अश्याना स्व.यशवंतराव केळकर अभाविपचे संस्थापक यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जातो हा पुरस्कार 1991 पासून दिला जातो त्यामुळे जयपूर येथे होणाऱ्या अभाविप च्या 68 व्या राष्ट्रीय अधिवेशनात दिला जाणार आहे .
नंदकुमार पालवे हे मूळ बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा तालुक्यातील पळसखेड(सपकाळ) या छोट्याश्या गावातील आहे .
बी. ए. एम. एस. चे शिक्षण पूर्ण झाल्यावर समाजाप्रती आत्मीयेतेचा भाव लक्षात घेता निराश्रित( बेघर )- एच .आई. व्ही. बाधित तसेच मनोरुग्णाची सेवा करण्याचा निश्चय करून गेल्या 10 वर्षांपासून 2012 पासून सपत्नीक सेवा देण्याचं काम हे पालवे दाम्पत्य अविरत करते आहे.
मनोरुग्ण माता बांधवांचा निवासी उपचार व पुनर्वसन प्रकल्प त्यांनी सुरू केलाय . ज्याचं म्हणणे आहे की चला जरा वेगळं जगुया बेघरांना निवारा देऊ या!
ज्या मनोरुग्णाला स्वतः च्या घरच्यांनी नाकारले अश्या मनोरुग्णाना ते आपल्या प्रकल्पात आणून स्वतः त्यांच्या वर उपचार करतात इतकेच नव्हे तर त्यांचे मलमूत्र सुद्धा स्वतः साफ करतात अश्या जवळपास 200 पेक्षा अधिक रुग्णांची सेवा ते करते आहेत .अश्या नंदकुमार पालवेना स्व.यशवंतराव केळकर युवा पुरस्कार मिळाल्यामुळे अभाविप विदर्भ प्रांताकडून अभाविप चे ध्येययात्रा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अभाविप चे पश्चिम क्षेत्रीय सह संघटन मंत्री श्री.राय सिंह जी,अभाविप विदर्भ प्रांत संघटनमंत्री श्री.विक्रमजीत जी कलाने, विदर्भ प्रांत विशेष निमंत्रित सद्स्य प्रा.प्रशांत देशमुख, विदर्भ प्रांत जनजाती छात्र कार्य संयोजक शक्ती केराम उपस्थित होते.