अनुसूचित जातीतील मांग/मातंग/मादगी/मादीगा समाजातील लाभार्थींना थेट कर्ज योजना

58

अनुसूचित जातीतील मांग/मातंग/मादगी/मादीगा समाजातील लाभार्थींना थेट कर्ज योजना

 

गडचिरोली,(Gadchiroli) दि.22 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय गडचिरोली अंतर्गत कर्ज योजने अंतर्गत अनुसूचित जातीतील मांग/मातंग/मादगी/मादीगा व या समाजातील बारा पोट जातीतील लाभार्थीं करिता उद्दीष्ट प्राप्त झालेले असून इच्छूक लाभार्थ्यांनी 02 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे प्रत्यक्ष येऊन रीतसर अर्ज सादर करावे. लाभार्थ्याशिवाय इतर व्यक्ती कडून अर्ज स्विकारण्यात येणार नाही. महामंडळास प्राप्त उद्दीष्टाच्या अधीन राहून थेट कर्ज योजने अंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येईल याची लाभार्थीनी नोंद घ्यावी. कर्ज प्रकरण 1.00 लक्ष च्या मर्यादित मंजूर करण्यात येईल. योजनेतील अटी व शर्तीचे परिपत्रक या समाज कल्याण कार्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहे. कार्यालयाचा पत्ता साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय.चौक,एल.आय.सी. रोड,गडचिरोली,येथे संपर्क साधावा असे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ गडचिरोली, जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here