महीला मावोवादी ने केले गडचिरोली जिला पोलीस दलासमोर केले आत्मसमर्पण

305

नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला, एका वरिष्ठ जहाल महिला माओवादी कॅडरने केले गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

शासनाने जाहिर केले होते एकुण 08 लाख रूपयाचे बक्षिस.

माओवाद्यांच्या गडचिरोली विभागाला संपूर्ण साहित्य पुरविण्याची जबाबदारी तिच्यावर होती.

S bharat news network गडचिरोली :-शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 671 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 27 जूलै 2024 रोजी जहाल महिला माओवादी नामे 1) रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता, कमांडर, टेलर टिम, गडचिरोली डिव्हीसी, वय 36 वर्ष, रा. बोटनफंुडी, ता. भामरागड, जि. गडचिरोली हिने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित जहाल महिला माओवादी सदस्याबाबत माहिती

 

1) रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता

 दलममधील कार्यकाळ

 

श्व् सन 2006 मध्ये पेरमिली दलममध्ये भरती.

श्व् सन 2007 पासुन सप्लाय टिम सदस्य म्हणुन काम करण्यास सुरुवात.

श्व् सन 2007-2008 मध्ये शिवणकला, कापड कटींंग व शिलाई मशिन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले.

श्व् सन 2008-14 मध्ये टेलरींग टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.

श्व् सन 2014 मध्ये टेलर टिममध्ये कमांडर पदावर बढती होऊन आजपर्यत कार्यरत

 

 कार्यकाळात केलेले गुन्हे

 चकमक -01

श्व् सन 2020 मध्ये मौजा पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 

 खून -01

श्व् सन 2019 मध्ये मौजा नैनवाडी जंगल परिसरात झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.

 

 

 आत्मसमर्पीत होण्याची कारणे.

 

 दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.

 नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.

 वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.

 दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.

 गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे.

 खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.

 चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.

 नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.

 गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.

 

 

 

 शासनाने जाहिर केलेले बक्षिस.

 

 

 महाराष्ट्र शासनाने रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

 

 

 आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.

 

 आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिला एकुण 5.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

 

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 23 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. शंभु कुमार, कमांण्डट 09 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here