Vasant Kulasange will sit on hunger strike in front of the university if that decision is not cancelled

109

गोंडवाना विद्यापीठाचा तो ठराव रद्द करावा

वसंंतराव कुलसंगे २६ जानेवारीपासुन आमरण उपोषणला बसणार

Vasant Kulasange will sit on hunger strike in front of the university if that decision is not cancelled

Santoshbharatnews:-:गडचिरोली, दि.२१ : सुप्रसिद्ध आदिवासी कार्यकर्ते आणि वीर बाबुराव आदिवासी विकास प्रबोधन समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंत कुलसंगे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा सिनेटचा ठराव रद्द करण्यात यावा व सदर सभागृहाला विर बाबुराव शेडमाके यांचे नांव देण्यात यावे, या मागणीसाठी येत्या २६ जानेवारीपासून गोंडवाना विद्यापीठा समोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री.कुलसंगे यांनी आज एका पत्राद्वारे विद्यापीठ प्रशासनाला या निर्णयाची माहिती दिली आहे.

श्री.कुलसंगे हे एक निष्ठावंत ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि गेली अनेक वर्षा पासुन वीर बाबुराव शेडमाके यांच्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा प्रसार करण्यात ते सक्रिय आहेत.

Mr. Kulasange is known as a loyal senior tribal activist and has been active in promoting the contribution of Veer Baburao Shedmake in the country’s freedom struggle for many years.

 

श्री.ेकुलसंगे यांनी विद्यापीठाला सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, आदिवासी बहुल गडचिरोली जिल्हयातील विद्याथ्र्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठाच्या सिनेटने आदिवासी क्रांतिकारक, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष करून सभागृहाला दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला आहे.

हा जिल्ह्यातील जनतेचा मोठा अपमान आहे. हा ठराव तात्काळ रद्द करून सभागृहाला शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे. या मागणीसाठी मी येत्या २६ जानेवारीपासून विद्यापीठासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे कुलसंगे यांनी स्पष्ट केले आहे.

कुलसंगे यांनी या पत्राच्या प्रती महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक आणि गडचिरोलीचे पोलीस स्टेशन प्रभारी यांना पाठवल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here