अखेर आमदारांचे स्वप्न साकार झाले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ९ ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ सोहळा
दूरदृश्य प्रणालीद्वारे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करणार गडचिरोलीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मानले राज्य व केंद्र सरकारचे आभार
दिनांक ५ ऑक्टोंबर गडचिरोली
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे हे त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. येत्या ९ ऑक्टोबरला देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा दूरदृश्य प्रणाली द्वारे संपन्न होणार आहे.गडचिरोली येथे शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अथक प्रयत्न केले. तात्कालीन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना घेराव घातला . महायुतीचे सरकार आल्याबरोबर पहिल्याच प्रवासामध्ये आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मागणीच्या प्रभावाने गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली. यामुळे या महाविद्यालयाच्या कामाला गती आली. अखेर या महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते होणार आहे . त्यामुळे गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे हे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे स्वप्न साकार होत आहे. याबद्दल आ .डॉक्टर देवराव जी होळी यांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले व यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अभिनंदन केले.गडचिरोली जिल्ह्याला महाविद्यालय मिळवून देणारे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले