जिल्ह्यातील स्थानिक लोह खनिज वाहतुक दारांना लोह वाहतुक करणारी कंपनी बेरोजगार करणाच्या मार्गावर

1364

जिल्ह्यातील स्थानिक लोह खनिज वाहतुक दारांना लोह वाहतुक करणारी कंपनी बेरोजगार करणाच्या मार्गावर?

शासन ठरविलेल्या दरानुसारकार्यारंभ आदेश न दिल्यास लोह खनिजाचे वाहतुक पुर्णपणे बंद आंदोलन करून बंद करू असा इशारा ट्रांसपोर्ट वेल्फेयर असोसिएशन,गडचिरोली ने आज पत्रकार परिषद मध्ये दिला आहे.

गडचिरोली   दि.13 ऑगस्ट 2024 मंगलवार s bharat news gadchiroli :-  स्थानिक जिल्हातील वाहतुक धारकांना न डावलता प्रथम प्राधान्य क्रमाने सर्व डेस्टिनेशनचे कार्यारंभ आदेश इतर कोणत्याही दलाल-मध्यस्थी मार्फत न देता सरळ लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी आणि त्रिवेणी अर्थमुवर्स प्रा.लि. कंपनीतर्फे शासन ठरविलेल्या दरानुसार कार्यारंभ आदेश न दिल्यास लोह खनिजाचे वाहतुक पुर्णपणे बंद करण्यास लोकशाहीच्या मागनि आंदोलन करणार असल्याचा इशारा शासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सुरजागड लोह खनिज सुरू होण्यापूर्वी स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य क्रमाने अनेक रोजगार मिळणार असल्याचे शासन प्रशासन व कंपनीकडून अनेकवेळा सांगितले गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारक यांनी स्वतःचे घर, जमीन गहाण ठेवुन लोह खनिज वाहतुकीसाठी जड वाहने खरेदी करून लॉयड कंपनीत कामावर लावले.

या दरम्यान काही वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांकडुन ७०-८० बाहने जाळण्यात आले, त्यात स्थानिक वाहतुकदारांचे देखील वाहने यात नक्षलवादी कडून जाळले गेले. सदर नुकसानीचे देखील कंपनीकडुन कोणत्याही प्रकारचे मदत न मिळाल्याने सुध्दा स्थानिक वाहतुकदार लोह खनिजाचे वाहतुक करण्यास परत वाहने कामावर पाठविले.

परंतु लोह खनिजाचे बाहतुक पुर्णपणे सुरळीत सुरू झाल्याचे चित्र दिसताच लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी/त्रिवेणीअर्थमुवर्स प्रा.लि. कंपनी यांनी मिळुन स्थानिकांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे अटी शर्ती लावुन लोह खनिजाचे वाहतुक करण्यापासुन वंचित करत आहे. तसेच कंपनी मार्फत सर्व डेस्टिनेशनचे कार्यारंभ आदेश न देता एका अन्य जिल्ह्यातील दलाल/मध्यस्तीकडुन कमिशनचे रक्कम घेऊन वाहतुक करण्यास भाग पाडीत आहे. तसेच लोह खनिजाचे वाहतुकीसाठी जिल्हा वाहतुकदारांना डावलुन इतर जिल्हा व राज्यातील वाहतुक धारकांना प्राधान्य क्रमाने वाहतुकीचे काम देत आहे. या सर्व प्रकरणामुळे स्थानिक बेरोजगार वाहतुकदार याचा लाभ होत नसल्याचे दिसून येत आहे.

सदर या प्रकरणाचे शासन स्तरावरून चौकशी करून लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी/ त्रिवेणी अर्थमुवर्स प्रा.नि. कंपनीला स्थानिक जिल्हा वाहतुक धारकांना सर्व डेस्टिनेशनचे इतर कोणत्याही दलाल/मध्यस्तीमार्फत कार्यारंभ आदेश न देता सरळ लॉयड मेटल्स बैंड एनर्जी लिमिटेड कंपनी/त्रिवेणी अर्थमुवर्स प्रा.लि. कंपनीतर्फे आदेश देण्यात यावे. लोह खनिज वाहतुकीसाठी देण्यात येत असलेल्या दर देखील शासनाने ठरविल्यानुसार दर देण्यात यावे. लोह खनिजाचे वाहतुकीसाठी जिल्ह्यातील वाहतुकदारांना न डावलता प्राधान्य क्रमाने सोडिंग व वाहतुकीचे काम देण्यात यावे. तसेच स्थानिक जिल्ह्यातील कोणतेही व्यक्ती लोह खनिज वाहतुकीसाठी वाहन खरेदी केल्यास तात्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

या निवेदनाचे तात्काळ निराकरण न केल्यास जिल्ह्यातील सर्व स्थानिक वाहतुकदार एकत्र येऊन १६ आगस्त पासुन लोह खनिजाचे वाहतुक पुर्णपणे बेमुदत बंद आंदोलन करणार आहे.

या पत्रकार परिषदेला स्थानिक जिल्हा वाहतुकदार निखील निमाई मंडल,आशिष अशोक मेडीवार, गणेश शंकर दासरवार, मल्लरेड्डी येमनुरवार,जमीर शेख,संदीप दिलीप गुडपवार,किशोर रापेल्लीवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here